जळगाव- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हाजीनगरजवळ पेट्रोल पंपासमोर एका ट्रॉलाने तरुणाला गुरूवारी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास चिरडल्याची घटना घडली. मृतदेहाचे तुकडे झाल्याने ओळख पटू शकली नाही.
हाजीनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एक 35 वर्षीय तरुण पायी चालत असताना मागून येणार्या ट्रॉलाने (पीबी 05, व्ही, 9318) त्यास चिरडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून ट्रॉलास नशिराबाद पोलिसांनी अडवले. यात चालक दिलीपसिंग (वय 42, रा. छत्तीसगड) याला अटक केली आहे.
रुग्णवाहिका पोहोचली उशिरा
राज्य शासनाच्या रुग्णवाहिका फोन केल्यानंतर 20 मिनिटांत मिळेल, अशी वल्गना करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळेच आहे. गुरुवारीदेखील खासगी रुग्णवाहिकाचालक सचिन जाधवला फोन केल्यानंतर रुग्णवाहिका 15 मिनिटांत घटनास्थळावर पोहोचली. मात्र, शासकीय रुग्णवाहिका 35 मिनिटांनी पोहोचली.