आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूच्या डंपरने एकाला चिरडले,दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर खोटेनगर परिसरातील वाटिका आर्शमाजवळ शनिवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. यात खंडेरावनगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीतील रवींद्र नामदेव चौधरी (वय 44) यांचा जागीच मृत्यू झाला.

चौधरी हे जैन पाइप येथे नोकरीस होते. शनिवारी सकाळी ते खासगी कामानिमित्त दुचाकीने (एमएच 19 एआर 8554) शहराबाहेर जात असताना त्यांचा अपघात झाला. बांभोरीकडून जळगावकडे वाळू वाहून नेणारा भरधाव डंपर (एमएच 15 बीजे 3187)ने रिक्षाला ओव्हरटेक करीत असताना मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसावर रवींद्र चौधरी दुचाकीसह डंपरच्या चाकाखाली आले. काही सेकंदातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी डंपरही ताब्यात घेतला आहे. पोलिस उपनिरीक्षक निकुंभे तपास करीत आहेत.

रवींद्र चौधरींचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. घटनास्थळावर सुमारे अर्धा तास मृतदेह पडून होता. डंपरच्या खाली अडकलेला चौधरी यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.