आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिकता ढासळली, त्रस्त लेखाधिकाऱ्यांना हवी महापालिकेतून कार्यमुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेतीलअडचणींमुळे वरिष्ठ दर्जाचे अधिकारी येथे येण्यास तयार नसल्याचे सर्वश्रुत आहे; पण गेल्या आठवडाभरापासून पालिकेचे मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात कार्यालयात आलेले नसल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी फॅक्स पाठवून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘या पदावर काम करताना त्रास होतो, माझी मानसिकता नाही’ असे वाक्य त्यांनी वापरले आहे. यामुळे आता तरी पालिकेचा कारभार सुधारण्याची नितांत गरजेचे झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची स्थिती अत्यंत वाईट असून, खडतर प्रवासातून मार्गक्रमण सुरू आहे, हे आता काही नवीन राहिलेले नाही. पालिकेची येथील स्थिती सुधारण्यालायक नसल्यामुळे आयुक्तपदापासून ते अन्य महत्त्वाच्या पदांवरदेखील जबाबदारी स्वीकारण्यास अधिकारी पुढे येत नव्हते. त्यामुळे या पालिकेत राजकीय हस्तक्षेपानंतर काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करून घेतल्याचा इतिहास आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर चित्र आता बदलेल असे वातावरण पाहायला मिळत आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून असलेल्या वातावरणामुळे अधिकाऱ्यांच्या मनातील खदखद आता बाहेर पडू लागली आहे. दरम्यान खरात यांना या पदावर काम करतांना नेकमा काेणता त्रास होत आहे. या बाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.
...तर कोणीच राहणार नाही
सध्याकर्जाच्या डोंगरात दबलेल्या महापालिकेत विकासाची कामे होत नाहीत. पेमेंट घेणाऱ्यांच्या रांगा आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नसल्याने त्यांचीही काम करण्याची मानसिकता नाही. मूलभूत गरजा भागवल्या जात नसल्याने नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे शासन नियुक्त अधिकाऱ्यांवर एक प्रकारे दबावाचे वातावरण आहे. चंद्रकांत खरात यांनी यातून सुटका करून घेण्यासाठी थेट फॅक्स पाठवण्याचा मार्ग शोधला. परंतु असे सर्वच अधिकाऱ्यांनी ठरवले तर पालिकेत एकही वरिष्ठ अधिकारी राहणार नाही. त्यामुळे पालिकेचा कारभार सुधारण्यासाठी आता ठोस कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होतेय.
सहकाऱ्यांजवळ व्यक्त केल्या भावना
पालिकेच्यातिजोरीच्या चाव्या हाती असलेले मुख्य लेखाधिकारी खरात यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांना दररोज नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तीन ते चार महिन्यांचे पगार थकल्याने आपल्याच कर्मचाऱ्यांच्या रोषाला समोर जाणे, मक्तेदारांचे देणे अदा केल्याने त्यांचाही सामना त्यांना करावा लागतोय. यात हुडको डीआरटी कोर्टातील सुनावणींमुळे सतत मुंबईच्या वारीचा त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे अनेकदा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवले. यापूर्वी पालिकेतील परिस्थितीमुळे शासनाकडून नियुक्त अधिकाऱ्यांची बैठक होऊन कार्यमुक्त करण्याबाबत एकमताने विनंती करण्याचेही ठरले होते, परंतु नंतर हा विषय मागे पडला होता. आता तर खरात यांनी त्याची सुरुवात केली आहे.
काय म्हटले आहे खरात यांच्या पत्रात?
आयुक्तसंजय कापडणीस यांच्या नावाने पाठवलेल्या फॅक्समध्ये लेखाधिकारी खरात यांनी म्हटले आहे की, सध्याच्या स्थितीत मला या पदावर काम करताना जास्त त्रास होत आहे. माझी या पदावर काम करण्याची मानसिकता नाही. तरी या पदावरून मला कार्यमुक्त करण्यात यावे, अशी िवनंती केली आहे. निधी अदा करण्याचे महत्त्वाचे काम असलेले खरात दररोजच्या समस्यांमुळे हतबल झाल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरात हे वैद्यकीय कारणास्तव कार्यालयात येऊ शकलेले नाहीत; परंतु त्यांचे आजारपण थेट कार्यमुक्तीपर्यंत पोहोचल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...