आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकट खून प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक, रेल्वेस्थानक परिसरातून पथकाने घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राजीवगांधी नगरातील राहुल प्रल्हाद सकट या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असलेल्या सत्यासिंग मायासिंग बावरी याला शनिवारी सकाळी ११ वाजेला रामानंदनगर पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली आहे.
 
राहुलवर बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चॉपरने हल्ला केल्यानंतर सत्यासिंग फरार झालेला होता. या प्रकरणात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सत्यासिंग याच्यासह रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मलिंगसिंग मायासिंग बावरी, मालाबाई सत्यासिंग बावरी, कालीबाई सत्यासिंग बावरी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. तर जखमी राहुल सकट याला मुंबईला उपचारासाठी नेत असताना नाशिकजवळ त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राजीव गांधीनगरातील नागरिक संतप्त झाले होते. आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. शनिवारी पोलिस कर्मचारी प्रदीप चौधरी शरद पाटील यांनी सत्यासिंगला रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. शनिवारी कालीबाईची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
 
राहुलचा गुरुवारी रात्री १२.३० वाजता मृत्यू झाला होता. आरोपींवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. यासंदर्भात शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे मांग गारुडी समाजाचे शिवलाल लोंढे इतर नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
बावरी कुटुंबीयांवर ४८ गुन्हे
जळगाव राहूल सकट या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सत्यासिंग बावरी याच्याविरूध्द दरोडा, चोरी, जीवघेणे हल्ले करण्याबाबत रामानंद नगर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून तडीपारीची शिक्षाही त्याने भोगलेली आहे. त्याच्याशिवाय या गुन्ह्यातील चार आरोपींवर विविध प्रकारचे तब्बल ४६ गुन्हे रामानंद नगर पोलिसात दाखल आहेत.
 
सत्यासिंग याच्याविरूध्द तीन दरोड्याचे गुन्हे, चार चोरी, घरफोड्या, दोन शस्त्रास्त्रांचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई केली आहे. त्याशिवाय दहशत निर्माण करणे, पनाका असे सर्व मिळून २० गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर त्याची पत्नी कालीबाई हिच्याविरुद्धही रामानंद पोलिस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. मलिंगसिंग याच्याविरूध्द रामानंद नगर, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याबरोबरच परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. मालाबाई हिच्याविरुद्ध यापुर्वी तीन तर रवीसिंग याच्याविरूध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...