आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी प्रेम प्रकरण उघडकीस, आरोपी आईला दोन दिवसांची पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- शहरातील सायली पाटील या महाविद्यालयीन तरुणीच्या खूनप्रकरणी अटकेतील तिच्या अाईने काही माहिती तपासादरम्यान पोलिसांना दिली आहे. या मुलीचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. परंतु, त्या तरुणाकडून त्रास होता, अशी माहिती सायलीच्या आईने पोलिसांना दिली, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सांगितले.
 
शहरातील शिवकॉलनी भागातील सायली पाटील या २० वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेतील तिची आई रत्ना पाटील ही पोलिस चौकशीत प्रत्यक्ष घटनेविषयी जास्त बोलत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. या तरुणीचा खून जुलै रोजी रात्री ८.३० ते १.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात झालेला आहे. त्यानंतर ११ रोजी दुपारी १२.३० वाजता पोलिसांनी या तरुणीची आई रत्ना अनिल पाटील हिला संशयित आरोपी म्हणून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता या महिलेस पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी रत्ना पाटील हिने पोलिस कोठडी दरम्यान खानेपिणे बंद केले होते. त्यामुळे तिला उपचारासाठी दोन दिवस सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणीच्या प्रेमप्रकरणाबाबत मात्र माहिती उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी शहरातील एका तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेतले होते. या घटनेचे मुख्य कारण आणखी काही संशयायितींच्या मागावर पोलिस आहेत.
 
घटनेचे गूढ कायम
याखुनात आणखी कोणाचा समावेश आहे काय, यात कोणत्या हत्याराचा वापर केला. गुन्ह्याचा मूळ उद्देश काय? तिची एवढी निर्घूण हत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप काहीच समोर आल्याने या घटनेचे गूढ कायम आहे. त्यामुळे सर्वांचे आता पुढील तपासाकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आई लहान भाऊ घरात झोपलेले असताना सायली पाटील या तरुणीची राहत्या घरात हत्या झालेली आहे. चाळीसगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले तिचे वडील अनिल हिंमत पाटील हे चाळीसगाव आगाराची बस घेऊन पंढरपूर येथे गेले होते. डोक्यावर वार करुन तिची हत्या झालेली आहे, अशी फिर्याद मयत सायलीच्या आईने पोलिसांत दिलेली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...