आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे खाते उघडणाऱ्या बँकांवर करणार कारवाई : जळगाव जी.प. सीईओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय गणवेशाकरिता दिली जाणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी शुन्य बॅलन्सवर खाते उघडण्यास राष्ट्रीकृत बॅँकांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासुन वंचित आहेत. अशा खाते काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. 
 
शाळा सुरू होवुन दोन महिन्यांचा कालावधी लाेटला असूनही अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याची स्थिती आहे. याबाबत बॅक व्यवस्थापनांची बैठक घेतली असुन त्यांना याविषयी सुचना दिल्या आहेत. तरी देखील तक्रारी कायम असल्याने याबाबत कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच शालेय पोषण आहाराबाबतही मुख्याध्यापकांना सक्त सुचना देण्यात आल्या अाहेत. आदेशाप्रमाणेच धान्यांची खरेदी करून गुणवत्ता राखण्यात येईल. यात हलगर्जीपणा दिसल्यास मुख्याध्यापकांना दोषी धरण्यात येणार असल्याचेही दिवेगावकर यांनी सांगितले. 
 
समितीचा अहवाल पाठवला 
विषयसमित्या निवडीमध्ये झालेला घोळ त्याविषयी आलेल्या तक्रारींबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आपली भुमिका त्यात मांडली आहे. अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती दिवेगावकर यांनी दिली. तर सामूहिक पाणीपुरवठा योजनांवरील थकीत वीज बिलांमुळे वीज कंपनीकडून सातत्याने वीज कापण्यात येते. यावर पर्याय म्हणून या योजनांवर सौरऊर्जा पंप बसवण्याबाबत प्रस्ताव तयार करणार असल्याचे सीईअाेंनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...