आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी मीटर तपासणी सुरू; 43 वीज चोरांविरुद्ध कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महावितरणने शहरात वीजचोरी तपासणी मोहिमेला वेग दिला असून बुधवारी शहरातील विविध भागात घरोघरी अचानकपणे धडक तपासणी मोहिम राबवून ४३ ग्राहकांवर वीज चोरीविरोधात कारवाई करण्यात अाली आहे. एमअायडीसी परिसरात ग्राहकांविरोधात वीज चोरी आणि मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी लाख रुपयांची वीज चोरी पकडण्यात महावितरण पथकाला यश आले. सुमारे १२ पथकांनी बुधवारी अचानक धाडसत्र सुरु केल्याने वीज चोरांमध्ये खळबळ उडाली आहे. 
 
महावितरणकडून कृषीपंपासह घरगुती वीजचोरी तपासणी केली जात आहे. बुधवारी शहरात कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्या नेतृत्वाखाली १२ टीम तयार करुन पिंप्राळा, निमखेडी, आहुजानगर, अयोध्यानगर, एमआयडीसी परिसरात वीजचोरी तपासणी करण्यात आली. यात निमखेडी, पिंप्राळ्यातून ग्राहकांनी वीज मीटर मध्ये फेरफार केल्याचे आढळले. यासह २९ ग्राहकांनी आकडे टाकल्याचे दिसून आले. अचानक होणाऱ्या तपासणीमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली असून आवश्यक तेथे पोलिसांची मदत घेऊन वीजचोराविरुध्द कारवाई सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. 
 
एमआयडीसीपरिसरात अाठ वीजचोरांविरोधात कारवाई 
यात एमआयडीसी परिसरातील हनुमाननगर, लक्ष्मीनारायणनगर, अपना घर कॉलनीत सहाय्यक अभियंता यांच्या पथकाने ग्राहकांविरुध्द वीज मीटरमध्ये फेरफार केल्या प्रकरणी कारवाई केली. यात व्यावसायिक , बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. यासह ग्राहकांनी आकडे टाकून वीजचोरी केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात सुनीता फुलपगारे, धमेंद्र जांगीड, सुधाकर महाजन यांच्यावर वीज मीटर मध्ये फेरफार प्रकरणी तर देव कन्स्ट्रक्शनसह भागवत बारी यांच्याविरोधात आकडे टाकल्याबद्दल कारवाई करण्यात आली. या भागातून सुमारे लाख रुपयांची वीजचोरी पकडली. अभियंता सुरेश पाचंगे, उमेश घुगे, किशोर वंजारी, मच्छिंद्र कोळी, दिलीप पाटील, दिलीप निकम, तुकाराम पाटील यांनी कारवाई केली. दरम्यान वीजचोरी थकबाकीचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये ही विशेष मोहिम राबविली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...