आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोक्का, ‘एमपीडीए’अंतर्गत चौघा गुन्हेगारांवर कारवाईचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाेलिस दलातर्फे शुक्रवारी पाेलिस कवायत मैदानावर हिस्ट्रीशीटर्स रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समक्ष बोलावून त्यांची माहिती घेण्यात अाली. या वेळी पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी गुन्हेगारांना पुन्हा गुन्हे केले तर कठोर कारवाई करण्याची तंबी दिली. तसेच शहरात विविध भागात राहणाऱ्या चार गुन्हेगारांवर मोक्का एमपीडीएची कारवाई करण्याचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील सहा पोलिस ठाण्यातील २४ हिस्ट्रीशीटर्स रेकॉर्डवरील ४० गुन्हेगार अशा एकूण ६४ गुन्हेगारांची ‘शाळा’ शुक्रवारी भरवली. या वेळी डॉ. सुपेकर यांनी प्रत्येक गुन्हेगाराला समोर बोलावून त्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. एमपीडीए, मोक्का यासह २२ जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई, जणांच्या विरोधात हद्दपारी २१ जणांवर कलम १४४ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधीक्षकांनी संबंधित पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना दिले.

चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवा
शहरातहोत असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना रोखण्यासाठी रात्रीच्या गस्ती वाढवा. गस्तींवर जास्त भर द्या, तसेच गस्ती वाढवण्यासाठी अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. तसेच सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी सज्ज राहावे, अशा सक्त सूचना अधीक्षकांनी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...