आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Committee For Movement Under District Transfers

आंतरजिल्हा बदल्यांसाठी कृती समितीचे आंदोलन, २०० शिक्षक सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची ४५० पेक्षा अधिक पदे रिक्त असताना या पदांवर शिक्षणसेवक भरतीचा घाट जिल्हा प्रशासनाने घातला आहे.
या पदांवर आंतरजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रस्तावपात्र शिक्षकांना त्वरित पदस्थापना मिळाव्यात या मागण्यासाठी शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शिक्षक यात सहभागी झाले आहेत. राज्यभरात जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात आले.

अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील प्राथमिक अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षकाचे काम करीत आहेत. पती-पत्नी एकत्रीकरणासह आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव अनेकदा देऊनही याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

या मागणीसाठी मंत्रालयावर धरणे आंदोलन करण्यासह लोकप्रतिनिधींकडेही हा प्रश्न मांडला आहे. राज्यअध्यक्ष विनोद राठोड, जितेंद्र गवळी, विनोद नाईक, प्रशांत पवार, नंदकिशोर देशमुख यांनी आंतरजिल्हा बदलीचा हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांने आंदोलकांची भेट घेतली नसल्याचेही शिक्षकांनी सांगितले.

अन्य ठिकाणी प्रस्ताव मंजूर
संचमान्यतास्थगित झाली असली तरी, अद्याप नियुक्त्या देण्याचे काम थांबवले जात आहे. धुळे जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यांनी आपल्या स्तरावर बदल्यांचे प्रस्ताव मंजूरही केले आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी शिक्षकांनी केला.