आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. प्लास्टिकचे ध्वज विक्री करण्यासह वापरण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे प्लास्टिकचे ध्वज विक्री करताना कुणीही आढळल्यास ध्वज संहितेतील तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ कलम नुसार कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिला आहे.

याविषयी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी सांगितले की, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यदिनी शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांतर्फे ध्वजारोहण केले जाते. राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शवण्यासाठी वैयक्तिकरीत्या छोट्या आकाराच्या प्लाॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी विखुरलेले आढळतात. हा प्रकार चुकीचा आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरास मान्यता नाही. त्याचबरोबर राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकू नये. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था, सामाजिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी केले आहे.