आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभरावर दुचाकीस्वारांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविराेधात शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली धडक कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. शुक्रवारी शहर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीस्वार, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, वाहतूक परवाना नसणे आदी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या शंभरावर दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

वाहतूक पोलिसांनी मू.जे.महाविद्यालय, ख्वॉजामियाँ चौक, महेश प्रगती मंडळ, बहिणाबाई चौक, कॅफे ९० डिग्री याठिकाणी दुचाकीस्वारांवर कारवाई केली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांच्या दुचाकी ताब्यात घेऊन त्या शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या दुचाकींमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अल्पवयीन मुलांच्या दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक होते.
मुलांसह पालकांनी घेतली शहर पाेलिस वाहतूक शाखेच्या कार्यालयात धाव
पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्यानंतर मुलांसह पालकांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पालक पोलिसांना दुचाकी देण्याची विनंती करत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना दुचाकी ताब्यात देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना लोकप्रतिनिधी तसेच मुलांच्या पालकांनी दुचाकी सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यांनीही दुचाकी सोडण्यास नकार दिला.
वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त करण्यात अालेली वाहने.

मुलांना पालकांसमाेरच समज देण्यात येणार
वाहतूकनियमांचा भंग करणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता बोलावलेले आहे. पोलिस अधीक्षक पालकांसमोर मुलांना समज देणार असून वाहतूक नियमांबाबतही मार्गदर्शन करणार आहेत. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या सर्वांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.

...तर पालकांवरच गुन्हे दाखल करण्यात येतील
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. वारंवार समज देऊनही पालक अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देत आहेत. यापुढे अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळून अाल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा