आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या पेपरला 33 जणांवर कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हाभरात बारावीच्या अर्थशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाच्या पेपरला एकूण 33 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात 13 विद्यार्थ्यांवर कॉपीच्या केस झाल्या. विभागीय शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकाच्या नियोजनाप्रमाणे रविवारी सकाळच्या सत्रात जीवशास्त्र विषयाचा तर दुपारी अर्थशास्त्र विषयाचा पेपर झाला. जीवशास्त्राला तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली.

यात न्यू इंग्लिश स्कूल पारोळा एक, किसान महाविद्यालय पारोळा दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अर्थशास्त्राच्या पेपरला गो.पू. पाटील (कडोलगाव, ता. भडगाव) येथे 14, नूतन मराठा महाविद्यालय (जळगाव) 13, जयहिंद कॉलेज (चाळीसगाव) येथील तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांच्या पथकाने पारोळा तालुक्यात तीन केंद्रांना भेटी दिल्या. दरम्यान, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांव्यतिरिक्त होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या.