आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची धडक कारवाई; गाळ्यांचे ‘शटर डाऊन’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गाळ्यांच्या कराराची मुदत संपल्यानंतरही गाळेधारक करार करत नाहीत आणि पाचपट दंडाची रक्कमही भरत नसल्यामुळे बुधवारी मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथकाने सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांना सील ठाेकण्याची कारवाई केली. पथकाने पाच तासांत गाळे सील केले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे गाळेधारकांची भंबेरी उडाली.
दरम्यान, या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे, तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही कारवाई १५ जूनपर्यंत स्थगित करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपासून आयुक्तांसह उपायुक्त, किरकोळ वसुली विभागाचे अधिकारी, कर्मचारी कायदेतज्ज्ञ सतत बैठकांमध्ये व्यस्त होते. परंतु, नेमके काय सुरू आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. पालिकेत बुधवारी बैठक सुरू होती. सकाळी पोलिस मनपात आल्याने वेगवेगळ्या चर्चाही रंगत हाेत्या. परंतु, अचानक किरकोळ वसुली अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दुपारी १२.२० वाजता पथक कारवाईसाठी फुले मार्केटमध्ये गेले.
आयुक्त संजय कापडणीस उपायुक्त प्रदीप जगताप यांच्या उपस्थितीत विधी अधिकारी केतन ढाके यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिकेत याचिकाकर्ता म्हणून पहिला क्रमांक असलेले निजामोद्दीन फकरुद्दीन बोहरी यांचा गाळा क्रमांक १२८ सील केला. त्यानंतर प्रकाश भिला वाणी यांचा गाळा क्र.१२७ (अमित ट्रेडर्स), साहेबराव सोनवणे यांचा गाळा क्र.५० (कल्पेश लेडीज टेलर्स), लक्ष्मीनारायण मुंगड यांचा गाळा क्र.१४० (नम्रता किराणा), अनिल मकडिया यांचा गाळा क्र.१७१, राजेश मकडिया यांचा गाळा क्र.१७२, जयंत संघवी यांचा गाळा क्र.१७७, सुरेश छाजेड यांचा गाळा क्र.१७९ ज्ञानेश भदादे यांचा गाळा क्र.१८७ हे सर्व गाळे सील करण्यात आले.
कारवाईपूर्वी दुकानातील माल काढून घेण्याची सूचना करण्यात आली हाेती. परंतु, संबंिधतांनी माल काढण्यास नकार दिल्याने मालासह गाळ्यांना कुलूप ठाेकण्यात आले. या वेळी पंचनामा करून त्यावर दुकानदारांची सही घेण्यात आली. तसेच ज्यांनी स्वाक्षरी केली नाही त्यांच्या दुकानावर पंचनाम्याची प्रत चिकटवण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६५१ गाळ्यांना सील लावण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात येणार आहे.
मालाचा लिलाव
ज्या गाळेधारकांनी कारवाई करताना दुकानातील माल किंवा साहित्य काढून घेतले नाही त्या मालाचा कालांतराने पालिकेतर्फे लिलाव करण्यात येणार आहे. तसेच गाळेधारकाकडे घ्यावयाच्या रकमेतून मालाचा पैसा जमा करून घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, खाद्यपदार्थ विक्रेते टेलर्सनी माल काढून घेत ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.
कारवाईसाठी महिला पथक तैनात
कारवाईदरम्यान दुकानातील महिला कर्मचाऱ्यांकडून अडचणी उभ्या राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. त्यात सुनीता सोनवणे, आशा संजय रोनवडे, रिहानाबी शेख तस्लिम, सरला लीलाधर तायडे, सुजाता पाटील मीना भावसार यांचा समावेश होता.
दुकाने बंद करण्याचे आवाहन
धनंजय राका यांनी सर्व दुकानदारांना एकत्र येऊन कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे हात जोडून आवाहन करताना दिसत होते. पण त्यांच्या आवाहानाला दुकानदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळाले.
पुनर्विलोकन अर्ज दाखल करणार
कारवाई सुरू होताच अॅड.डी.एच.परांजपे यांना निरोप दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी उपायुक्त जगताप यांना खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला असून, स्थगिती मिळवणार आहोत. तोपर्यंत कारवाई करू नये, असे सांगितले. परंतु, उपायुक्तांनी कारवाई थांबवण्याचा अधिकार मला नसल्याचे स्पष्ट केल्याने अॅड.परांजपे गाळेधारक आयुक्तांकडे गेले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गाळेधारकांचा भ्रमाचा भोपळा फुटला...