आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी ‘अॅक्शन प्लॅन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यात सोशल मीडियासंदर्भात गुन्हे दाखल करण्यासाठी तत्काळ माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासह कुख्यात गुन्हेगारांबाबत हद्दपारी एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांचे देवी-देवतांचे फोटो टाकून विटंबना करू नये. तसेच समाजात धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारे कॉमेंट्स करू नये त्यास कोणीही लाइक करू नये किंवा शेअर करू नये, असे आवाहनही डॉ. सुपेकर यांनी केले आहे. भावना भडकावणाऱ्या व्यक्ती किंवा अनुचित प्रकार करताना जमाव आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
भावना भडकावण्याचे काम करणारे, बँकेच्या एटीएमचा पासवर्ड विचारून पैसे लुबाडणारे निदर्शनास आल्यास पोलिस अधीक्षक डॉ.सुपेकर यांना (९८२३२०२७९५), पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांना (९०४९९८८०१३) पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण पटवर्धन यांना (९८२२३०७६१६) या क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कुख्यात गुन्हेगारांबाबत एमपीडीए हद्दपारीचे प्रस्ताव
शहरातील कुख्यात गुन्हेगारांबाबत एमपीडीए आणि हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात जे प्रस्ताव नाकारले गेले असे एकूण २२ प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात येणार आहेत. तसेच नवीन ४० गुन्हेगारांबाबत हद्दपारीचे प्रस्ताव िदवसांत तयार करून कारवाई करणार येणार आहे.
मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही
शहरात सध्या दिवसाढवळ्या घरफोड्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रकार घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे प्रयत्न सुरू असून, लोकसहभागातून हा उपक्रम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हे उघड होण्यास मदत झाली.
गुन्हेगार दत्तक योजना
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात एलसीबीतील कर्मचाऱ्याला प्रत्येकी १० गुन्हेगार दत्तक दिले आहेत. त्यांच्या सर्व हालचालींवर या कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. एवढेच नव्हे, तर दत्तक गुन्हेगाराने काही गुन्हा केल्यास त्याबद्दल उत्तरदेखील संबंधित कर्मचाऱ्याला द्यावे लागणार आहे.