आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activist Protest News In Marathi, Aazami Photo Burning Issue At Jalgaon

आझमींचा फोटो जाळून निषेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - समाजवादी पार्टीला मतदान न करणार्‍या मुस्लिमांची डीएनए चाचणी करण्याचे वक्तव्य करणार्‍या अबू आझमींबद्दल जळगावात वातावरण चांगलेच तापले आहे. मनियार बिरादरीने न्यायालयात खेचण्याचा इशारा दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अल्पसंख्याक सेवा संघातर्फे सोमवारी निदर्शने करत आझमींचा फोटो जाळण्यात आला.
लखनऊ येथे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुस्लिमांना उद्देशुन जे सपाला मतदान करणार नाहीत त्यांची डीएनए चाचणी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुस्लिमांसंदर्भात केलेल्या या वक्तव्याचा अल्पसंख्याक समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जळगावात मनियार बिरादरीनंतर अल्पसंख्याक सेवा संघातर्फे रस्त्यावर उतरत या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास टॉवर चौकात निदर्शने व काही मिनिटे रास्ता रोकोचा प्रय} केल्यानंतर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शाहूनगरात आझमींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी आझमींचा फोटो असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी जाळून संताप व्यक्त केला.
वातावरण तापतेय
केवळ मुस्लिम समाजाच्या मतांवर सत्ता मिळणे अशक्य बाब असताना अशा प्रकारे अबू आझमी मुस्लिमांना उद्देशुन वक्तव्य करीत असल्याने शाहूनगरातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसात संघटनांकडून रस्त्यावर उतरून आंदोलने होऊ लागल्याने वातावरण तापत असल्याचे चित्र आहे.
टॉवर चौकात आझमींचा फोटो जाळताना पदाधिकारी.
धर्म व राजकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आझमींनी डीएनए चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. अबू आझमी हे तडजोड करणारे नेते असून त्यांचे डान्सबार, दारूची दुकाने असताना त्यांना असे बोलण्याचा अधिकार नाही. मुबीन शेख, माजी नगरसेवक.