आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activists Of Hindu Organizations, Lateat News, Divya Marathi

गोधन वाहतुकीवरून वातावरण तापले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-कत्तलीसाठी गोधन घेऊन जात असल्याच्या संशयावरून तरुणांनी पकडलेल्या टेम्पोमध्ये आठ गोर्‍हे आढळून आल्याने शहर पोलिस ठाण्यात प्रचंड गर्दी होऊन वातावरण तापले होते. दरम्यान, गोधनाची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी चोपडा येथील एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती.
पप्पू राठोड व अभिषेक देशपांडे या तरुणांना शिवाजीनगर पुलाजवळ गोधन असलेला टेम्पो (क्र.एमएच-19/एस-1165) दिसला. ते गोधन कत्तलीसाठी नेले जात असावे, असा संशय आल्याने दोघांनी तो टेम्पो अडवला व नंतर शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. त्यात आठ गोर्‍हे आढळून आले. वास्तविक केवळ सहा प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना असताना या टेम्पोत आठ गोर्‍हे कोंबलेले होते. तथापि, हे गोधन कत्तलीसाठी नव्हे, तर नेरी येथे गुरांचा बाजार असल्याने चोपडा येथून घेऊन जात असल्याचे वाहनचालक इकबाल रहीम खान (वय 25, रा.गोल मंदिर, चोपडा) याने पोलिसांना सांगितले. हा टेम्पो चोपडा येथील रहिवासी शोएब अब्दुल कुरेशी यांच्या मालकीचा आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात
गोधन कत्तलीसाठी जात असल्याची माहिती कळताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी गर्दी वाढत गेल्याने वातावरण तापले होते. गुरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.