आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास दाबल्याने गोडसे कळले नाही- अभिनेता शरद पोक्षेंचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सत्यलपवलं जातं तेव्हा दंतकथांना पेव फुटताे. नथुराम गोडसे यांच्याबाबत तेच झालं आहे. गोडसे शेवटचे सात दिवस पोलिसांना जे सांगत होते, ते जर त्या वेळेच्या नेहरू सरकारने दाबून ठेवलं नसतं तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, असे स्पष्ट मत ‘मी नथुराम गोडसे बोलतो,’ या नाटकातून नथुराम गोडसे साकारणारा अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ते नाटकाच्या प्रयाेगानिमित्त जळगावात अाले असता, पत्रकारांशी बाेलत हाेते.
पोंक्षे म्हणाले की, गोडसेंनी गांधी हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर त्यांनी आपले विचारही प्रकट केले होते. भलेही त्यांचे विचार कुणाला पटले असते किंवा पटलेही नसते, पण ते जगासमोर यायला हवे होते. लोकशाही राष्ट्रात असे कुणाचे विचार दाबून ठेवणे योग्य नाही. हे नाटक आणि गोडसेंचा पुतळा उभारण्यामागे गोडसे समर्थकांची संख्या वाढवावी हा उद्देश आहे का? आम्हाला कोणतेही समर्थक वाढवायचे नाही आणि कुणाचे घटवायचेही नाहीत. केवळ गोडसेंचे जे विचार होते ते लोकांपुढे मांडायचे आहेत. लोकशाहीत विचार मांडणे हा हक्क कुणालाही आहे, असेही त्यांनी सांिगतले. मोठ्याप्रमाणात नाटकांचे प्रयोग सादर करण्यामागे केंद्र आणि राज्यातील बदललेल्या सरकारची विचारधारा पोहाेचवायची आहे का? देशातील सत्तांतरानंतरचा हा विचार नाही. भारत हा ८५ टक्के हिंदूंचा देश आहे. त्यामुळे हिंदूंनी मोदींना पंतप्रधान केले त्यात त्यांचं काय चुकलं. गेली ६० वर्षे खरा इतिहास अाणि गाेडसेंचे िवचार दाबून ठेवले अाहेत. ते मांडणे हाच एक उद्देश असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.
‘५५ काेटींचे बळी’
गाेपाळगाेडसे यांनी जन्मठेपेची िशक्षा भाेगल्यानंतर ‘५५ काेटींचे बळी’ हे पुस्तक लिहून खरा इितहास जगासमाेर अाणण्याचे काम केले. मात्र, सरकारने त्या पुस्तकावरही बंदी घातली. लाेकशाहीत असे करणे अयाेग्य अाहे, असे मत शरद पाेंक्षे यांनी व्यक्त केले.