आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी दर्जेदार साहित्य वाचून व्यक्तिमत्त्व घडवावे, अभिनेता यशपाल शर्मा यांचा युवकांना सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाजचे तरुण माेबाइल, इंटरनेच्या अाहारी जाऊन भरकटले अाहेत. एक दिवसही माेबाइल शिवाय राहू शकत नाही. काळानुसार या सगळ्यांचा वापर करायला हवा, पण ताे मर्यादित असावा. त्यामुळे तरुणांनी चांगले साहित्य वाचन करुन अापले व्यक्तिमत्त्व घडवायला हवे, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेते यशपाल शर्मा यांनी व्यक्त केले. 
 
राेटरी क्लब अाॅफ वेस्टच्या ‘अामाे अाखा एक से’ या लघुपटाच्या प्रीमियर शोच्या उद््घाटनसाठी ते जळगाव आले होते. या वेळी त्यांनी राेटरी भवन मायादेवीनगर येथे जळगावातील तरुण, नाट्य कलावंतांशी संवाद साधला. या वेळी जननायक फाउंडेशनचे नाट्यकलावंत हाेनाजी चव्हाण, प्रतिभा शर्मा, झिलाबाई वसावे, अध्यक्ष सूरज जहांगीर, सचिव कृष्णकुमार वाणी, गनी मेमन अादी राेटरी वेस्टचे पदाधिकारी उपस्थित हाेते. शर्मा यांनी विविध विषयांवर कलावंतांशी मनसाेक्त संवाद साधला.

 नाटकसशक्त माध्यम 
यशपालशर्मा म्हणाले, मनाेरंजनाचे साधन सध्या खूप वाढले असून घराघरात ते पाेहाेचले अाहे. एका क्षणात प्रेक्षकांना सगळे उपलब्ध हाेते. अशातच नाटक टिकविणे हे अाव्हान अाहे. पण नाटक हे समृद्ध सशक्त माध्यम असून अापण त्या ताकदीने पाेहोचवायला हवे. अापले १०० टक्के बेस्ट द्या, तक्रार करू नका, तुमच्या कल्पकतेचा अधिकाधिक उपयाेग करून नाटक करा. मी अातापर्यंत ७० पेक्षा अधिक नाटके केली अाहे. पण जी भूमिका करेल त्या झाेकून देत काम करेल. नाटक हे तर प्रत्येक शाळांमध्ये शिकवायला हवे. कारण यात तुमच्यातील कल्पकतेला वाव मिळताे.

स्वत:पासून सुरू करा
भारतात अतिशय समृद्ध साहित्य अाहे. त्या साहित्याचा अानंद घ्यायला हवा. या क्षेत्रात तरुणांना करियर करायचे असल्यास स्वत:पासून सुरुवात करा. साहित्यातून अनेक गाेष्टी समजतील. वैयक्तिक सादरीकरण करायला शिका. सगळे सकारात्मकच वातावरण मिळेल, असे नाही तर ते बनवावे लागते. स्वत:पासून सुरू करून स्वत:ला लहान, कमकुवत समजता जे चांगले गुण अाहे, त्याचा याेग्य वापर करा, असेही शर्मा यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...