जळगाव - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जळगाव केंद्रातून परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांच्या निकालात प्रचंड घोळ झाला आहे. परीक्षेला हजर राहूनही काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकात गैरहजर असल्याचा शेरा मारण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुक्त विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात असलेल्या मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला अाहे. १२ मे राेजी या विद्यार्थ्यांचा ‘सामाजिक परिवर्तन’ विषयाचा पेपर मू.जे. महाविद्यालयात झाला. याशिवाय इतर काही विषयंाच्या पेपरसंदर्भातही असे घडले आहे. नुकताच या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. मात्र, सुमारे ३० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांवर ‘सामाजिक परिवर्तन’ या विषयाच्या गुणांऐवजी चक्क गैरहजर असल्याचा शेरा मारण्यात अाला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. त्या दिवसाचा पेपर दिला असल्याचे पेपरला हजर असल्याचे पर्यवेक्षकांच्या स्वाक्षरीचे कागदही संबंिधत विद्यार्थ्यांकडे आहेत; परंतु त्यांना गैरहजर असल्याचा निकाल प्राप्त झाला अाहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. शहरासह जिल्हाभरातील प्रत्येक केंद्रावर अशाच प्रकारे ५-१० विद्यार्थ्यांच्या निकालात चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.
विद्यार्थीसंतप्त
दरम्यान,रविवारी नूतन मराठा महाविद्यालयातील केंद्रावर निकाल घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रकार लक्षात अाला. त्यांनी केंद्रावर असलेले सहायक ज्ञानेश्वर ठाकरे अजय शिंदे यांना जाब विचारला. मात्र, मुक्त विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका नाशिक येथे तपासल्या जात असल्यामुळे जळगावातील केंद्राची ही चूक नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिंदे ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना हजर असल्याच्या पुस्तकाच्या झेरॉक्स काढून दिल्या. या वेळी विद्यार्थी चांगलेच संतापले होते.
नाशिकला जाऊन चूक दुरुस्त करणे शक्य
^जिल्ह्यातीलप्रत्येक केंद्रावर अशीच स्थिती अाहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका नाशिकला तपासल्या जातात तेथेच गुणपत्रकेही तयार होतात. ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात चुका आढळून येत आहेत, त्यांना हजेरी पुस्तकाच्या झेरॉक्स देत आहोत. संबंिधत विद्यार्थ्यांना नाशिकला जाऊन चूक दुरुस्त करता येईल. अजयशिंदे, केंद्र सहायक
वर्ष वाया जाण्याची भीती
^आम्हीपेपर दिलेला असूनही गैरहजर असल्याचा निकाल आला आहे. आता नाशिकला जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा वेळ आणि पैसे खर्च होणार आहेत. याशिवाय वर्ष वाया जाण्याची भीतीही आहे. शारदाबावस्कर, विद्यार्थिनी
विद्यार्थ्यांना वेळ अन् अार्थिक भुर्दंड सहन करावा लागणार
याप्रकारामुळे संबंिधत विद्यार्थ्यांना हजेरी पुस्तकाची झेरॉक्स घेऊन नाशिक येथे जावे लागणार आहे. तेथे अर्ज केल्यानंतर त्यांचे पेपर तपासले जाण्याची प्रक्रिया होईल. त्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांनुसार गुणपत्रके बदलवून दिली जातील. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या विद्यार्थ्यांना नाशिक येथे मुक्त विद्यापीठात जावेच लागणार आहे नाहक हा भुर्दंड सोसावा लागणार आहे. आधीच नोकरी-व्यवसायातून वेळ काढून विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतात. त्यातच अशा भोंगळ कारभारामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे.