आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श अहवालावर विधिमंडळाचा अधिकार: एकनाथ खडसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आदर्श सोसायटीचा अहवाल हा विविधमंडळात सादर झालेला आहे. त्यामुळे हा अहवाल आता सभागृहाची व सार्वजनिक मालमत्ता झाली आहे. त्यात बदल करायचा असेल तर तो अधिकार केवळ विधिमंडळालाच आहे, असे मत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मांडले. आदर्श अहवालासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून फेरविचार करू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. यावर खडसे यांनी सांगितले की, फेरविचाराचा निर्णय मंत्रिमंडळ घेऊ शकत नाही. त्याचा निर्णय विधिमंडळात घेतला जाईल. यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, असे ते म्हणाले.