आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्तीच्या संदेशासाठी 1 लाख 65 हजार किलो मीटरची भ्रमंती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील अमृतसर येथील अमनदीपसिंह यांनी व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यासाठी 1 जानेवारी 2008 पासून देशभर भ्रमंतीला सुरुवात केली. पंजाब, मद्रास, पांडेचरी, कर्नाटक, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, हरियाणा व सध्या महाराष्ट्रातील अजिंठय़ापर्यंत त्यांचा सायकल प्रवास झाला आहे. 5 वर्षे 38 दिवसांच्या प्रवासानंतर ते शुक्रवारी जळगावात दाखल झाले आहेत.

चार सायकल आणि 22 टायर
दररोज 100 ते 150 किलो मीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता असल्याने त्यांना पाच वर्षात चार सायकली बदलाव्या लागल्या. 22 टायर आणि 8 ट्यूब बदलवावे लागले. बँकेतील एक लाखांपैकी 80 हजार रुपये खर्च झाले आहेत. मुलीच्या लग्नाला त्यांना जाता आले नाही, त्यामुळे अमेरिकेत गेलेला मुलगा नाराज झाला आहे.

इंटरनेट, फेसबुकने कनेक्ट
सायकलीवर गाठोडे घेऊन नऊ राज्यात भ्रमंती करणारे अमनदीप सिंग पदवीधर असून त्यांना कन्नड, तेलगू, तमीळ, पंजाबी, हिंदी व इंग्रजी अशा सहा भाषा येतात. गाठोड्यात अत्यावश्यक वस्तूंसोबत लॅपटॉप असून ते इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जुळलेले आहेत. त्यांचा मुलगा श्रवणसिंग डॉक्टर असून सद्या अमेरिकेत आहे. फेसबुकवर त्यांचे 612 मित्र आहेत. विसावा घेण्यासाठी थांबल्यावर नेटच्या माध्यमातून ते संवाद साधतात.

जागतिक विक्रमानंतर परतणार
अमेरिकेतील जॉन विल्सन यांनी 1 लाख 25 हजार किलो मीटर सायकल प्रवास करून गिनीज बुकात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अमनदीपसिंह यांची आतापर्यंत 1 लाख 65 हजार किलोमीटर भ्रमंती झाली आहे. गिनीज बुकाने या विक्रमाची नोंद घेण्यासाठी मार्च महिन्यात त्यांना मुंबईत आमंत्रित केले आहे.