आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Additional Commissioner Take Charge Of Dhule Municipal Commissioner

धुळे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त घेणार पदभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे -

प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मंत्रालयाच्या गृह विभागातील कक्ष अधिकारी दत्तात्रय कदम यांची सामान्य प्रशासन विभागाने दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने निवड केली आहे.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त होते. या पदावर के. व्ही. धनाड यांची वन विभागातून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर आता गृह विभागातील कक्ष अधिकारी दत्तात्रय कदम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांचे अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे नवीन पद भरतीची गरज आहे ; परंतु त्यासाठी महापालिकेला सेवानियमावली मंजूर करावी लागणार आहे. महापालिकेने विविध पदांचा आकृतिबंध शासनाकडे सादर केला आहे.

अप्पर जिल्हाधिकारी प्रभारी आयुक्त
महापालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले हे २५ जानेवारीपर्यंत प्रशिक्षणासाठी पुणे येथे जात आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.