आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Additional Divisional Commissioner Sonali Ponkshe

सहकारी पतसंस्थांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल द्या, विभागीय अपर आयुक्त सोनाली पोंक्षे यांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव जिल्ह्यातील बंद सहकारी पतसंस्थांसंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय अपर आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी दिले. नाशिक येथे सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले होते. या वेळी ठेवीदारांच्या तक्रारींसंदर्भात बोलताना अपर आयुक्तांनी विभागीय सहनिबंधकांना पुढील लोकशाही दिनात बंद पतसंस्थांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जळगाव जिल्ह्यातील काही सहकारी पतसंस्थांमध्ये झालेल्या अफरातफरीमुळे काही पतसंस्था बंद आहेत. यासंबंधी विविध ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून लोकशाही दिनात सादर करण्यात येणाऱ्या तक्रारी निवेदनांची दखल घेत श्रीमती पोंक्षे यांनी संबंधित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. ज्येष्ठ नागरिक, उपवर मुली, आजारी व्यक्ती यांच्या ठेवींसदर्भात प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना देऊन विभागीय सहनिबंधकांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोमवारच्या विभागीय महिला लोकशाही दिनात विविध विभागांच्या २१ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यापूर्वीच्या ६७० पैकी ४१९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २५१ तक्रारी प्रलंबित आहेत. या वेळी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नाशिक येथे विभागीय अायुक्त कार्यालयात लाेकशाही दिनात अपर अायुक्त साेनाली पाेंक्षे यांच्याशीे चर्चा करताना ठेवीदार.