आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Additional Superintendent Of Police Speaking At Society

वैयक्तिक भांडणांना सामाजिक रंग नको- अपर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तांबापुरा भागात तीन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून वैयक्तिक वाद झाले. हे वाद आपसातच सोडवा, वैयक्तिक भांडणांना सामाजिक रंग देऊ नका, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांनी तांबापुरावासीयांना केले.

रविवारी सायंकाळी 5 वाजता पोलिस प्रशासनातर्फे तांबापुरातील बिलाल मशीद चौकात शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांच्यासह उप अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस निरीक्षक डी.एस.शिनगारे, इमाम मुबारक अली आदी उपस्थित होते.

अंबिका यांनी विशेष करून महिलांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दंगल किंवा संचारबंदीमुळे सर्वात जास्त नुकसान महिलांचे होते. पुरुष मंडळी कामधंद्यांसाठी घराबाहेर असतात. अशा वेळी महिला, लहान मुले घरी असतात. दंगल किंवा भांडण सुरू असताना महिलांनी स्वत: घरातून बाहेर न पडता. इतरांनाही बाहेर पडू देऊ नये. दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांपासून दूर रहा. असे करणार्‍यांची माहिती पोलिसांना कळवा. सर्वच लोक चांगले असतात. अफवांवर विश्वास ठेवून आपले मत खराब करू नका. दंगलीत झालेल्या नुकसानाच्या झळा ह्या आपल्यालाच सोसाव्या लागतात. त्यामुळे भांडणे सामोपचाराने सोडवा,असा मोलाचा सल्लादेखील त्यांनी दिला.

संचारबंदीत पुन्हा वाढ
रविवारी सकाळी 9 वाजता संचारबंदी हटवण्यात आली होती. दरम्यान, दुपारी अप्पर पोलिस अधीक्षक एन. अंबिका, उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तांबापुरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच रविवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 6 दरम्यान पुन्हा संचारबंदी करण्यात आली होती. त्यामुळे तांबापुरात रात्री पुन्हा शुकशुकाट होता.

नागरिकांना हवीय पोलिस चौकी
बैठकीला हजर असलेल्या नागरिकांनी तांबापुरातील मच्छी बाजार, हटकर चौक, बिलाल चौक या ठिकाणी पोलिस चौकी असावी, अशी मागणी बैठकीत केली. त्यावर एन.अंबिका तसेच बच्छाव यांनी सहमती दर्शवली आहे. लवकरच सर्वेक्षण करून शक्य त्या ठिकाणी पोलिस चौकी सुरू करणार असल्याचे अंबिका यांनी सांगितले.

मुळापर्यंत जाऊन चौकशी करणार
पोलिस दंगलीच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करणार आहेत. जे निदरेष असतील त्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले जाईल. मात्र जे मूळ सूत्रधार आहेत, ते पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून शासन केले जाईल. नागरिकांनी काहीही अडचण असली तरी पोलिसांना थेट कळवावे, त्यांना मदत केली जाईल. तांबापुरातील वातावरण निर्भय करण्याचा प्रय} पोलिसांचा आहे, असे बच्छाव यांनी सांगितले.