आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार कार्ड’च्या नोंदणीमध्ये फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अडीच हजार नागरिकांनी 2011 मध्ये आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. त्यातील 700 ते 900 नागरिकांनाच आधार कार्ड मिळाले. उर्वरित नागरिकांचा संगणकीय डाटाच गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. समाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी याप्रकरणी ऑनलाइन पद्धतीने तपासणी केल्याने हा प्रकार उघड झाला.

शासनातर्फे विप्रो या कंपनीला आधार कार्ड नोंदणीचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने देव आयटीपीएल प्रा.लिमिटेड अहमदाबाद या उपकंपनीला कंत्राट दिले होते. या वेळी वॉर्ड क्रमांक 42 मधील अडीच हजार नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 700 ते 900 जणांनाच आधार कार्ड पोस्टाच्या माध्यमातून घरपोच मिळाले. उर्वरित नागरिकांना आधारची प्रतीक्षा आहे. यूआयडीएआय या शासनाच्या बेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने सद्य:स्थिती तपासली असता डाटा उपलब्ध नाही. कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांनी यूआयडीएआयकडे डाटाच पाठवला नसल्याचे या माध्यमातून पुढे आले आहे.