आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० रुपयांत मिळतोय ‘आधार’, आधार एजंटांचा गोरखधंदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘सरलडाटाबेस प्रणाली’साठी शाळामध्ये वदि्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पालकांची पाल्याचे आधार कार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. ही गरज ओळखून आधार कार्ड नोंदणी करणारे एजंट एका कार्डसाठी चक्क १०० ते ३०० रुपये उकळत आहेत. असा धक्कादायक प्रकार सोमवारी गोलाणी मार्केटमध्ये सुरू असल्याची तक्रार ‘दिव्य मराठी’कडे आल्यानंतर प्रतिनिधीनी संबंधित केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. या वेळी एंजट पैसे घेत होता. याप्रकाराची माहिती महसूल यंत्रणेला दिल्यानंतर पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शहानिशा करून आधार कार्डची यंत्रसामुग्री जप्त केली आहे.

गोलाणी मार्केटच्या डी विंगमधील शर्मा सायबर कॅफेमध्ये सोमवारी आधार नोंदणी सुरू होती. शाळामध्ये आधार कार्डची सक्ती असल्यामुळे अनेक वदि्यार्थी, पालक आजी-आजोबा पहाटे पासून रांगेत उभे होते. एका कार्ड नोंदणीसाठी १०० रुपये तर नोंदणी पावतीवरून ई-आधार कार्ड काढून देण्यासाठी ८० रुपये आकारले जात होते. पैसे देऊनही त्रास वाढतोय म्हणून एका त्रस्त नागरिकांने दुपारी वाजता ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात येऊन आधार कार्ड काढण्याच्या गोरखधंद्याबाबत माहिती दिली. त्यामुळे ‘दवि्य मराठी’ने घटनेची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले. या वेळी अनेकांनी आमच्याकडून १०० रुपये घेऊनही पहाटेपासून बसवून ठेवण्याची तक्रार केली. त्यामुळे प्रतिनिधीने या गंभीर प्रकाराबाबत महसूलला कल्पना दिली. प्रांताधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी तहसीलमधून पथक घटनास्थळी पाठवले. नंतर प्रतिनिधीने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याशीही संपर्क साधला. त्यानंतर नायब तहसीलदार डी.एस.भालेराव यांनी तलाठी मंडल अधिकाऱ्यांना तातडीने गोलाणी मार्केटमध्ये पाठवले.

शर्मा सायबर कॅफेमध्ये पंचनामा करताना महसूलचे कर्मचारी.
होय, आम्ही पैसे घेतो : ‘होयसाहेब, आम्ही फक्त १०० रुपये घेतो. इतर ठिकाणी तर ३०० रुपये घेतात. १०० पैकी ३० रुपये मी घेतो आणि उर्वरित सायबर कॅफेचालकाला द्यावे लागत असल्याचा जबाब केंद्रावरील ऑपरेटर योगेश यांनी तलाठी फिरोज खान यांच्याकडे दिला.

आयएपी कंपनीच्या आधार कार्ड नोदणी किटला शालेय नोदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव तहसीलदारांना पत्र दिले आहे. याच कंपनीला चाळीसगाव येथेही काम देण्यात आले आहे. वदि्यार्थ्यांचे आधार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाणे अपेक्षित असताना आधार कार्ड आॅपरेटर्सनी मात्र मार्केटमध्ये दुकाने थाटून वसुली सुरू केली आहे. प्रत्येकी १०० ते ३०० रुपये आकारले जात असल्याने आधार नोंदणीसाठी एजंट सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करीत आहेत. ते दररोज २० ते ३० हजार रुपयांची कमाई होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

हतबल झालेल्या नागरिकांचे घूमजाव
आधारसाठीसकाळी वाजेपासून रांगेत उभ्या असलेल्या महिला, वदि्यार्थ्यांचा सायंकाळी नंबर लागला. दरम्यान, माध्यमांकडे तक्रार केल्याचे कारण पुढे करत सायबर कॅफे चालकाने आधार नोंदणी बंद केली. ‘तक्रार केली मग आता तुम्हीच भोगा’, असे सुनावले. या वेळी हतबल झालेल्या नागरिकांनी ‘दवि्य मराठी’च्या प्रतिनिधीला घेरून आमची काहीच तक्रार नाही. सायबर कॅफेचालक पैसेच घेत नाहीत. त्यामुळे आम्हाला नोंदणी करू द्या, पैसे घेतले तरी चालतील पण वेळ वाया जायला नको. आम्ही कामे सोडून सकाळपासून रांगेत उभे असल्याचे सांगितले. शाळेत शिक्षक बसू देत नसल्याने नातवंडांना घेऊन आल्याचे एका आजीबाईने रडतच सांगितले. दरम्यान, तक्रार केल्यामुळे आधार नोंदणी करणार नसल्याचे सायबर कॅफेचालक नितीन शर्मा यांनी सुनावले.

आधार नोंदणीचे किट जप्त
तहसीलकार्यालयातील मंडळ अधिकारी एस. जी. घुले तलाठी फिरोज खान यांनी शर्मा सायबर कॅफेमध्ये जाऊन कारवाई केली. एकीकडे नागरिक विनवण्या करीत असताना सायबर कॅफेचालकांने मात्र अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे सांगत नोंदणी बंद केली. घाईगर्दीत सायबर कॅफेच्या खोलीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी पथकाने पुन्हा खोली उघडून पंचनामा करून कारवाई केली. यात कॅमेरा, लॅपटाॅप, स्कॅनर, फिंगर प्रिंटर, आय स्कॅनर ताब्यात घेतले.

हजारोंची कमाई
शहरात गोलाणी मार्केटसह विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणी सुरू आहे. प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळे किट असले तरी शहरात कमाई अधिक मिळत असल्याने अनेक जण कमिशन बेसवर कोठेही जागा उपलब्ध करून घेत आधारसाठी प्रत्येकी १०० ते ३०० रुपये घेत आहेत.