आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मासात सर्वाधिक धार्मिक कार्यक्रम, आजपासून सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दर तीन वर्षांनी येणारा अादर्श पुरुषाेत्तम मास अर्थात अधिक महिन्याला उद्या बुधवारपासून प्रारंभ हाेणार अाहे. भारतीय संस्कृतीत अधिक मासाला विशेष महत्त्व असल्याने यानिमित्त शहरातील मंदिरांसह नागरिकांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येणार अाहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर कार्यक्रमांची रेलचेल असणार अाहे.

दर तीन वर्षांनंतर अधिकमास येताे. वर्षात ३६५ दिवस असतात. त्यात साैरवर्षात ३६५ तर चंद्रवर्षात ३६४ दिवस असतात. कालगणनेनुसार दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडताे. हा ३३ दिवसांचा फरक काढण्यासाठी तीन वर्षांनंतर एक महिना अधिक पाळला जाताे. भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व असल्याने अधिक मासालाही विशेष महत्त्व असते. या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्यामुळे अधिक लाभ हाेताे, अशी समजूत नागरिकांची असते. त्यामुळे मंदिरांमध्ये भागवत सप्ताहासह इतरही धार्मिक कार्यक्रम अायाेजित करण्यात येतात. अधिक मासात विष्णू उपासना श्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे अधिकाधिक नामस्मरण, दानधर्म या मासात फलदायी ठरत असते. तसेच अधिक मासात पाेथीवाचन, सामूहिक पारायणाचे कार्यक्रमही हाेत असतात. प्रामुख्याने महिलांकडून या महिन्यात विविध प्रकारचे व्रतवैकल्य करण्यात येतात. या काळात नित्य नैमित्तिक कर्मे करण्यात येत असली तरी मुंज, विवाह अादी शुभकार्य करू नये, असे ज्येष्ठांकडून सांगण्यात येते. अधिक मासासाठी शहरातील पुराेहितांनाही अनेक ठिकाणी धावपळ करावी लागते. त्यादृष्टीने त्यांच्याकडून संपूर्ण महिन्याचे टाइमटेबल तयार करण्यात अाले अाहे.

३३ दिवसांचे प्रतीक म्हणून ३३ वस्तूंचे दान...
अधिकमास हा ३३ दिवसांचा फरक भरून काढत असल्याने या ३३ दिवसांचे प्रतीक म्हणून अनेकांकडून ३३ वस्तूंचेही दान करण्यात येते. तसेच ३३ जाेडप्यांना भाेजन देऊन अन्नदानातून मिळणारे पुण्यप्राप्तीही काही जण करतात.

पाैष, माघ अधिक येत नाही
अधिकमास हा काेणत्या तरी मराठी महिन्याला जाेडून येताे. दर तीन वर्षांनी त्यात बदल हाेताे. त्यात पाैष, माघ अधिक कधीच येत नाही. तर अधिक अाषाढ दर १८ वर्षांनी, अधिक चैत्र, ज्येष्ठ, श्रावण दर १२ वर्षांनी, अधिक अश्विन १४१ वर्षांनी तर अधिक कार्तिक दर ७०० वर्षांनी येत असल्याची माहिती धनंजय गद्रे यांच्याकडून देण्यात अाली अाहे.

जावयांना महत्त्व
अधिकमासात जावयांना विशेष मान असताे. खान्देशात या महिन्याला धाेंड्याचा महिना असेही संबाेधले जाते. सासरच्या मंडळींकडून या महिन्यात जावई लाेकांना धातूच्या वस्तूंचे दान करण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जण अापल्या कुवतीनुसार साेने, चांदी, तांबे अादी धातूच्या वस्तूंचे दान करीत असतात. त्यामुळे बाजारपेठेतही माेठ्या प्रमाणावर उलाढाल हाेते.
बातम्या आणखी आहेत...