आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Admission Ability Is Extra 10 Present In North University

उमवित प्रवेश क्षमतेच्या १० टक्के वाढीव जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वरिष्ठ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य विज्ञान शाखेत आतापर्यंत शासनाने निर्धारित केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेपेक्षा २० टक्के अतिरिक्त जागा दिल्या जात होत्या. मात्र, यंदा शासनाने अतिरिक्त जागा देण्याचा नियम अचानक बंद केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्रथम वर्षाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी सर्व महाविद्यालयांत प्रवेशक्षमतेच्या १० टक्के वाढीव जागा देण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
शासनाने २० टक्के जागा बंद केल्यामुळे शहरातील सुमारे हजार ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हते. मात्र, दुस-या तिस-या वर्षाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय जुलै रोजी विद्यापीठाने घेतला. त्यानंतर आता प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठीही १० टक्के वाढीव जागा दिल्यामुळे महाविद्यालये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व महाविद्यालयांनी प्रवेशक्षमतेच्या १० टक्के वाढीव जागांवर प्रवेश द्यावे, असे डॉ.मेश्राम यांनी कळवले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे
शासनाने २० टक्के जागा बंद केल्या आहेत. मात्र, आपण विद्यापीठ पातळीवर १० टक्के जागांची सूट देत आहोत. तसेच द्वितीय तृतीय वर्षासाठीही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे. डॉ.सुधीर मेश्राम, कुलगुरू

प्रवेश देणे महाविद्यालयांना बंधनकारक
विद्यार्थ्यांनादुस-या तिस-या वर्षाला प्रवेश देण्यासाठी विद्यापीठाने आधीच परवानगी दिली आहे. मात्र, तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात अशा प्रवेशांपोटी महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी ८०० रुपयांचा दंड भरावा लागत आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. तथापि, विद्यापीठाने दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. याबाबत तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करणार असल्याचेही डॉ.मेश्राम यांनी सांगितले.

विद्यार्थी संघटनांचे यश
जागावाढून मिळाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, युवा शक्ती फाउंडेशन यासारख्या संघटनांनी आंदोलने केली आहेत. आता विद्यापीठाने प्रथम वर्षासाठी १० टक्के, तर द्वितीय तृतीय वर्षासाठी २० टक्के सूट दिल्यामुळे संघटनांच्या आंदोलनांना यश आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा विषय चांगलाच चिघळला होता.