आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आठवडाभरात १६ लाखांचे तेल अन‌‌् 6 लाखांचा खवा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सणासुदीच्या काळात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांची तपासणी अन्न औषध प्रशासनाने सुरू केली आहे. आठवडाभरात शहरातील विविध दुकानांतून १६ लाख रुपयांचे तेल, लाख रुपयांचा खवा ५२ हजार रुपयांचे डालडा तूप जप्त केले आहे. दरम्यान, ग्राहकांनी अन्नपदार्थांची खरेदी करताना खात्रीलायक ठिकाणावरून योग्य बिले घेऊनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाने केले आहे.
दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून, खाद्यपदार्थांची रेलचेल बाजारपेठेत वाढली आहे. त्यामुळे काही विक्रेते भेसळयुक्त पदार्थांचा वापर करून दिवाळीत फराळाचे पदार्थ मिठाई बनवत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहाेचताे. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने शहरात आठवडाभरापूर्वीच तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरासह विविध भागांतून खाद्यतेलाचे १० नमुने, तर पिठाचे ७, मिठाई १० खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

भेसळ आढळल्यास कारवाई जप्तपदार्थांचे नमुने नाशिक, पुणे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवले असून, त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. या अहवालात भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. खवा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला आहे. भेसळ आढळल्यास तो नष्ट करणार येणार आहे. ही कारवाई अन्न औषध विभागाचे सहायक अायुक्त मिलिंद शाह यांच्या नेतृत्वाखाली अन्न अधीक्षक आर.आर.चौधरी, संदीप देवरे,िलीप सोनवणे, अनिल गुजर यांनी ही कारवाई केली.

खरेदीपूर्वीच खात्री करा
^दिवाळीसणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी तपासणी नमुने घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रसंगी संशय असलेला माल जप्तही केला जात आहे. ग्राहकांनी खाद्यपदार्थांच्या खरेदीपूर्वीच मालाची खात्री करून स्वच्छता असलेल्या ठिकाणावरून माल घ्यावा. भेसळ आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात. संदीपदेवरे, निरीक्षक, अन्न आैषध प्रशासन विभाग

ग्राहकांनी घ्यावी काळजी
{ ग्राहकांनी बाजारपेठेत पदार्थांची खरेदी करताना लेबल पाहून वस्तू खरेदी कराव्यात.
{ बॅच नंबर, पॅकेजची तारीख पाहून माल खरेदी करावा.
{ खाद्यपदार्थांच्या खरेदीनंतर बिल आवश्यक घ्यावे.
{ भेसळयुक्त पदार्थ असल्याची अन्न औषध विभागाकडे त्वरित तक्रार करावी.
बातम्या आणखी आहेत...