आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रुटी आढळल्याने २५ दुकानदारांना नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अन्न औषध प्रशासनातर्फे दिवाळीच्या कालावधीत रवा, बेसन, तेल मिठाईची विक्री करणाऱ्या दुकानांतून अन्नपदार्थांचे ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याचबरोबर त्रुटी आढळून अाल्याने २५ दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दिवाळीत घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ तयार करण्यात येतात. मात्र, अनेक जण फराळाच्या पदार्थांची बाजारातून खरेदी करतात. त्यात मिठाईसह चिवडा, रवा, बेसन, तेल, खवा आदी पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, त्याचा फायदा घेऊन या पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार होतात. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तसे होऊ नये यासाठी शासनाने अन्न औषध प्रशासनाला दिवाळीच्या कालावधीत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अन्न औषध प्रशासनातर्फे ते १० नोव्हेंबरदरम्यान शहरातील विविध दुकानांची पाहणी करण्यात येऊन ३५ नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले अाहेत. त्याचबरोबर त्रुटी आढळून अाल्याने २५ दुकानदारांना नोटिसाही बजावण्यात आल्या.
दिवाळीत फराळाचे तयार पदार्थ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे फराळाचे पदार्थ विक्री करणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाकडे नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा सुमारे २० विक्रेत्यांना फराळाचे पदार्थ विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यात आले होते.
फराळ विक्रेत्यांनी केेली नोंदणी

कर्मचाऱ्यांची कमतरता...
अन्नऔषध प्रशासनाच्या शहरातील कार्यालयातून धुळे नंदुरबार जिल्ह्याचा कारभार बघितला जातो. या कार्यालयात एक सहायक आयुक्त एक अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत अाहे. नंदुरबारमध्येही एकच अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना दोन्ही जिल्ह्यांतील दुकानांना भेटी देण्यासह नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अाणखी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज आहे.

१० हजार व्यावसायिक आहेत नोंदणीकृत
शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना अन्न अाैषध विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार धुळे नंदुरबार जिल्ह्यात साधारणपणे १० हजार किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी पाच वर्षांसाठी ७०० रुपये शुल्क घेण्यात येते. ज्या दुकानदारांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा हजार ४०० उत्पादकांना परवाने देण्यात अाले आहेत.

नमुने टिकून राहतात त्याच स्थितीत...
अन्नऔषध विभागाकडून दिवाळीच्या दिवसांत खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात येतात. त्यात काही नाशवंत पदार्थही असतात. त्यात दूध, दही अादी पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ टिकून राहण्यासाठी नमुना घेताना ते ज्या स्थितीत आहेत, त्यात टिकण्यासाठी फॉमेलीन नावाचे रसायन टाकण्यात येते. त्यामुळे हे नमुने अनेक दिवस त्याच स्थितीत टिकून राहतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.