आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायद्याच्या नियंत्रणाशिवाय माणूस पशूवत : अ‍ॅड. चौधरी;मान्यवरांनी केले कायद्याविषयी मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सर्वसामान्यांना कायद्याचे अजिबात ज्ञान नसते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कायद्याविषयी आजपर्यंत हवी तशी जनजागृती झालेली नाही.
सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कायद्यासंदर्भात योग्य जागृती आवश्यक आहे. अगदी माध्यमिक स्तरावरही कायद्याचे शिक्षण देणे आज गरजेचे असल्याचे मत या वेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी मांडले.
आज अगदी गरीबांपासून उच्चवर्णियांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाइल बघायला मिळतात. शिवाय सायबर कॅफेवर सर्वच स्तरातील व्यक्ती काही ना काही कामासाठी जात असतात. त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्यात लोकांनाच सायबर क्राइम आणि कायद्याविषयी माहिती असते. सायबर क्राइमविषयी माहिती नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे परखड मत या वेळी डॉ. विजेता सिंग यांनी मांडले.
प्रत्येक व्यक्ती दररोज काही तरी वस्तू विकत घेत असते. मात्र, अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होते. त्यापैकी अनेकांना ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहितीच नसल्याने समोरच्याचे फावते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे असल्याचे सांगून अ‍ॅड. भूषण पाटील यांनी उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

प‌थनाट्यातून जनजागृती
शिबिराच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून रॅगिंग, अंधश्रद्धा, महिलांवरील अत्याचार, वृद्ध आणि ग्राहक संरक्षणासंदर्भातील कायद्यांची प‌थनाट्याच्या माध्यमातून जागृती केली. रॅगिंगमुक्त समाज, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांनी या वेळी पथ‌नाट्याच्या माध्यमातून दिला.