आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलांचे दोन दिवस काम बंद आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयातर्फे तीन नवीन कायदे संसदेसमोर मांडण्यात येणार आहेत. ते वकिलांच्या व्यवसायावर हेतूपुरस्कररित्या केला जाणारा आघात असल्याने विरोध दर्शविण्यासाठी वकिलांनी दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. तापी पूर्णा वकील संघ भुसावळ हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष अँड. कैलास लोखंडे यांनी दिली.
केंद्र सरकारतर्फे हायर एज्युकेशन अँण्ड रिसर्च बिल 2011, दी नॅशनल अँक्रेडिटेशन रेग्युलेटरी अँथॉरिटी फॉर हायर एज्युकेशन इन्स्टिटयुशन्स बिल 2010 आणि दी फॉरेन एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स बिल 2010, दी नॅशनल लॉ स्कूल बिल 2011 हे नवीन कायदे करण्याकरिता बिले संसदेसमोर मांडण्यात येणार आहेत. परराष्ट्रातील संस्थांना भारतात प्रवेश देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे. पर्यायाने भारतीय संस्कृती, भारतीय संस्था, गरीब विद्यार्थी आणि भारतीय विधिज्ञ परिषद आणि भावी पिढय़ांना दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे या तीन बिलांना विरोध करण्यासाठी दोन दिवस तापी-पूर्णा वकील संघटनेचे सर्व सदस्य दोन दिवस न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदवणार नाहीत.
तापी-पूर्णा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी काम बंद आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन तापी-पूर्णा वकील संघाचे अध्यक्ष अध्यक्ष अँड.कैलास लोखंडे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.