आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरेंचा वारसदार रेकॉर्डवर आणण्यास वकिलांचा अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबन केल्याप्रकरणी कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. याप्रकरणी सादरेंचे वकील अॅड. विजय दाणेज यांनी गुरुवारी न्यायालयात सादरेंचा वारसदार रेकॉर्डवर आणण्यासाठी अर्ज सादर केला आहे.

सादरेंच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचे काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गुरुवारी अॅड. दाणेज यांनी न्यायाधीश आर. एस. भाकरे यांच्या न्यायालयात वारसदार रेकॉर्डवर आणण्यासाठी अर्ज सादर केला. सादरे यांच्या वारसदार त्यांच्या पत्नी माधुरी सादरे असण्याची शक्यता आहे.

पुनर्निरीक्षणासाठी अर्ज
सादरेयांच्यावर न्यायालयाने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या गुन्ह्यात सादरे यांचे वकील दाणेज यांनी गुरुवारी न्यायाधीश ए.के.पटनी यांच्या न्यायालयात फौजदारी पुनर्निरीक्षणासाठी (क्रिमिनल प्रिव्हिजन) अर्ज सादर केला. तसेच सादरे यांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, अॅड. दाणेज यांनी प्रतिनिधींची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज सादर केला. या प्रकरणी पुढील कामकाज डिसेंबरला होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...