आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्यावरून गुद्यावर; वकिलांची हाणामारी, न्यायालयातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या कायदेतज्ज्ञांमध्ये एेकीव माहितीवरून निर्माण झालेला वाद मुद्यावरून थेट गुद्यापर्यंत पाेहोचल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता जिल्हा न्यायालयाच्या परिसरातच घडली. यामुळे दाेन वकिलांमधील जोरदार हाणामारीने पक्षकारांची चांगलीच करमणूकही झाली. मात्र, न्यायालयाच्या परिसरातच ही हाणामारी झाल्याने चिंताही व्यक्त करण्यात अाली.

जिल्हा न्यायालयाच्या पूर्वेला संरक्षण भिंतीला लागून असलेल्या जागेत वकिलांचे टेबल लावण्यात अाले अाहे. या ठिकाणी पक्षकारांशी चर्चा किरकाेळ कामे उरकण्यात येतात. गुरुवारी दुपारी दाेन वकिलांमध्ये एेकीव माहितीवरून निर्माण झालेला शाब्दिक वाद थेट मारहाणीपर्यंत पाेहोचला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर धक्काबुक्की थेट चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात अाली. या वेळी बुटाने मारहाण सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली हाेती.

काेणीतरी काहीतरी सांगितले अाणि त्यातून निर्माण झालेला विषय वकिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पाेहोचवणारा ठरला. काही वकिलांनी मध्यस्थी करत वाद साेडवला. हाणामारीमध्ये एकाच्या कपाळावर जखम झाली हाेती. न्यायासाठी ज्यांचा अाधार घ्यावा लागताे, त्याच वकिलांमध्ये एेकीव माहितीवरून जाेरदार वाद हाेत असेल तर सर्वसामान्यांनी काय बाेध घ्यावा? असा सूर व्यक्त करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...