आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार! रात्री १० वाजेनंतर डीजे, बॅण्ड वाजवल्यास होणार कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लग्नसराईतडीजे बॅण्ड पथकांमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी शहरातील ६० डीजे बॅण्ड पथकचालकांची गुरुवारी बैठक घेतली. त्यात डीजे बॅण्ड पथकचालकांना रात्री १० वाजेनंतर वाद्ये पूर्णपणे बंद करावीत, ज्यांनी परवानगी घेतली असेल त्यांचीच ऑर्डर घ्यावी, सायलेन्स झोन, शाळा, महाविद्यालये रुग्णालय परिसरात वाद्ये वाजवू नये आदी सूचना दिल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशारादेखील डॉ.सुपेकर यांनी डीजेचालकांना दिला आहे.