आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ वर्षांनंतर लागले ग्रहण; वर्षातून सहा महिने आकाशात दिसतो तारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चंद्राने सोमवारी रात्री ८.१८ वाजता ‘स्वाती’ ताऱ्याला पूर्णपणे झाकले होते. एक तास मिनिटांनंतर स्वाती तारा दुसऱ्या कडेने पुन्हा दिसू लागला. खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. खगोलीय भाषेत चंद्राने स्वाती ताऱ्याला ग्रहण लावल्याची ही घटना होती.

सुमारे १२ ते १३ वर्षांनंतर ‘स्वाती’ ताऱ्याला ग्रहण लागले. हा तारा चंद्रापेक्षा अत्यंत लहान आहे. सोमवारी रात्री ८.१८ मिनिटांनी तो चंद्राच्या मागे झाकला गेला. तर ९.२७ मिनिटांनी दुसऱ्या कडेने पुन्हा दिसू लागला. स्वाती तारा हा वर्षातून सुमारे महिने अवकाशात दिसून येतो. लालसर चमक असलेला हा देखणा तारा स्वाती नक्षत्र नावानेही ओळखला जातो. चंद्र, सूर्य, पृथ्वी यासारख्या मोठ्या ग्रहांना लागणारे ग्रहण सामान्यपणे सर्वच जणांच्या आकर्षणाचा विषय असतो. स्वाती नावाच्या या छोट्याशा ताऱ्याचे ग्रहण सामान्यांसाठी आकर्षण ठरले नाही. मात्र, खगोल अभ्यासकांसाठी ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाची घटना
अवकाशात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटना अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या असतात. स्वाती ताऱ्याला लागलेले ग्रहणही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे चंद्राचा फिरण्याचा वेग, अंतर यावर संशोधन करता येऊ शकते. सतीश पाटील, खगोल अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...