आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After 20 Years Jalgoan District Milk Federation Face Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव जिल्हा दूध संघाची २० वर्षांनंतर होणार निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हासहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचादेखील बिगुल वाजला आहे. दूध संघ गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)च्या अधिपत्याखाली होता. १५ फेब्रुवारीपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन जूनअखेर संचालक मंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर दूध संघाची निवडणूक होणार आहे.
सहकारातील घटना दुरुस्तीनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी दुग्ध उत्पादन विभागाच्या विभागीय उपनिबंधक एम.जी. वाके, सहनिबंधक बी.एम. महाले तळ ठोकून होते. जिल्ह्यातील सक्रिय दूध उत्पादक संस्था त्यातील मतदानास पात्र असलेल्या ४८४ सदस्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. सहकारातील सुधारित तरतुदींची तपासणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. यानंतर जूनअखेर दूध संघावर नवीन संचालक मंडळ निवडून येण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांत नवीन संचालक मंडळ
प्राथमिकमतदार यादी तयार झाली आहे. यात काही बदल होऊ शकतात. प्रत्येक तालुक्यातून एक राखीव मतदार आणि दाेन स्वीकृत सदस्य, असे सुमारे २० जणांचे संचालक मंडळ असू शकते. मनोजलिमये, व्यवस्थापकीय संचालक, एनडीडीबी

सहकारातून १९७१ मध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाची स्थापना झाली होती. मात्र, २४ वर्षांत १६.५ कोटी तोट्यात गेल्याने दूध संघाचा कारभार १५ सप्टेंबर १९९५ रोजी एनडीडीबीच्या प्रशासनाने ताब्यात घेतला. एनडीडीबीच्या नियंत्रणात २० वर्षांत दूध संघ तोट्यातून १८ कोटी रुपये नफ्यात आला. जळगाव येथील दूध प्रक्रिया पॅकेजिंग प्रकल्प, चाेपडा, फैजपूर, पाचोरा, पारोळा येथे चिलिंग सेंटर अशी मालमत्ता दूध संघाची आहे. दूध संघाचे दूध नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, ब-हाणपूरपर्यंत वितरित होते. दूध संघाचा प्रतिदिन १०० मेट्रिक टन पशुखाद्यनिर्मितीचा कारखाना नशिराबाद येथे आहे.