आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनानंतर शिकवणीत काम करून दीपाली ‘बीई’ला चाैथी, यूपीएससीची तयारी करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर उच्च शिक्षण कसे करावे? असा प्रश्न उभा राहिल्यानंतर दीपाली पवार हिने माेठ्या हिमतीने कुटुंबीयांना अाधार देऊन स्वत: कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली. सकाळी काॅलेज, संध्याकाळी शिकवणीत काम, तर रात्री अभ्यास असा दिनक्रम ठरवून घेत जिद्दीने अभ्यास करत यशाला गवसणी घातली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करत दीपालीने एसएसबीटी महाविद्यालयात इलेक्ट्रिकलच्या शेवटच्या परीक्षेत पहिली, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून चौथा क्रमांक पटकावला अाहे. 
 
अाशा बाबानगरातील रहिवासी एसएसबीटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीपाली भगवान पवार (बडगुजर) हिच्या वडिलांचे १४ ऑगस्ट २०१६ रोजी अचानक निधन झाले. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी वडील गेल्यानंतर प्रचंड खचलेल्या दीपालीने स्वत:ला सावरत कुटुंबप्रमुखाची भूमिका वठवली. तिनेे शहरातील खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत जागून केले. कोणत्याही शिकवणीचा आधार घेता स्वतःच नोट्स काढून तिने अभ्यास पूर्ण केला अाहे. याच दरम्यान, एक भाऊ दहावीला, तर दुसरा बारावीला होता. 

त्यांचा घरीच अभ्यास घेतला असून त्या दाेघांना अनुक्रमे ८६ व ६४ टक्के गुण मिळून ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कठाेर मेहनतीची फलश्रुती म्हणून दीपाली एसएसबीटीतून पहिली उमवित चौथी अाली. तिला बीईच्या दुसऱ्या वर्षाला ८२, तृतीय वर्षाला ८७ टक्के, तर चाैथ्या वर्षाला ९०.३० टक्के मिळाले अाहे. तिला एसएसबीटीने प्राध्यापिका म्हणून नाेकरी दिली अाहे. ही नाेकरी सांभाळून तिला अाता यूपीएससीचा अभ्यास करून अधिकारी व्हायचे अाहे. तिला आई सुनीता पवार, मोठे काका राजेंद्र पवार, संतोष पवार, जितेंद्र कोतवाल, समाधान बडगुजर, जगदीश पचलोड, दीपक साळुंखे यांनी बळ दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...