आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Long Time Ramesh Jain In Jalgaon Corpoartion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमेश जैन यांचे ब-याच दिवसांनंतर महापालिकेत झाले दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आपल्या शिस्तप्रिय आणि परखड व्यक्तिमत्वामुळे महापालिकेत दरारा असणारे खान्देश विकास आघाडीचे पालिकेतील नेते माजी महापौर रमेश जैन यांची घरकुलप्रकरण तापल्यापासून महापालिका तसेच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दुर्मिळ झाली होती. ब-याच दिवसानंतर बुधवारी सकाळी पालिकेतील आपल्या दालनात येऊन दुपारपर्यंत कामकाज करून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
घरकुलप्रकरणामुळे महापालिकेचे राजकीय वातावरण गेल्या चार महिन्यात चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे मार्गदर्शक मानले जात असलेले प्रदीप रायसोनी यांच्या अटकेच्या कारवाईनंतर इतर आजी-माजी नगरसेवकांनाही या कारवाईला सामोरे जावे लागले. या सर्व अस्थिरतेच्या काळात स्पष्टवक्ते असलेले रमेश जैन सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाले होते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र, तीन महिन्यात झालेल्या बहुतांश बैठकांना ते वैद्यकीय तसेच विविध कारणांमुळे अनुपस्थित होते. घरकुलाचे वातावरण शांत होण्याच्या मार्गावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे महापालिकेत आगमन झाले. दुपारी दीडवाजेपर्यंत ते महापालिकेत होते.
सर्व विभागप्रमुखांशी केली विस्तृत चर्चा - बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा यासह सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. स्थायी तसेच महासभेतील काही प्रलंबित विषयांसंदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन अधिकाºयांना त्यांनी सूचना दिल्या. या वेळी खान्देश विकास आघाडीचे गटनेते नितीन लढ्ढा उपस्थित होते. अधिकाºयांनी सामान्य नागरिकांची कामे थांबवू नयेत, अशाही सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
व्यापारी प्रतिनिधींशी साधला संवाद - महापालिका प्रशासनाने व्यापा-यांना नोटिसा बजावल्याअसून त्यासंदर्भात सुनावणीचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे तसेच तारखा बदलण्यामुळे व्यापा- यांची गैरसोय होत असून सुनावणीसाठी आलेल्या सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मंधान यांच्यासह पदाधिकाºयांशी रमेश जैन यांनी चर्चा केली. व्यापाºयांना काय अडचणी येत आहेत, त्यांची मागणी काय आहे याबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली.