आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरही मुलींना इच्छेप्रमाणे शिकू दिले पाहिजे - डॉ. मुक्ता महाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ज्या उद्देशाने शिक्षण घेतो ताे उद्देश पूर्ण झाला पाहिजे. आयुष्यात तत्त्वांशी तडजोड केली नाही म्हणून माझ्या हातून काही चांगली कामे होत गेली, असे विचार उमविच्या भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्ता महाजन यांनी व्यक्त केले. डॉ. महाजन यांनी अविवाहित राहून सावित्रीबाई जाेतिबा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाचा वसा पुढे सुरू ठेवण्याचे कार्य केले. स्वत:च्या संसारात गुंतण्यापेक्षा समाजालाच आपले कुटुंब समजून काम केले, असेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी स्त्रीमुक्ती दिवस आहे, यानिमित्त डॉ. महाजन यांनी व्यक्त केलेल्या भावना...

संसारात गुरफटता समाजसेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान
>माझे लग्नाचे वय होते, तेव्हा समाजात हुंडा, मुलींच्या शिक्षणाला विरोध,अशा प्रथा होत्या. मात्र आई-वडिलांनी आम्हा तिघा बहिणींना उच्च शिक्षण दिले. समाजाचा विरोध पत्करून त्यांनी आम्हाला उच्चशिक्षित केले. त्यामुळे हे कार्य पुढे नेण्याचा विचार मनात आला.
>कुण्या मुलीने लग्न करू नये, असे मला कधीही वाटले नाही. लग्न नक्कीच करावे पण मुलींनी शिकू नये, हा विचार चुकीचा आहे. त्यामुळे मी माझ्या तत्त्वांची तडजोड केली नाही. अविवाहित राहून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत राहिले.
>पीएच.डी.चे शिक्षण घेणारी मी जळगावातील पहिलीच महिला ठरली. इंदूर येथील अहिल्याबाई विद्यापीठातून मी १९९५ला पीएच.डी. पूर्ण केली. फुलेंनी बघितलेले स्त्री शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. इतर मुलींनी शिक्षण घ्यावे, यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीत राहिले.
>माझ्या सोबतच्या लग्न झालेल्या मुली, विद्यार्थिनींना अवेळी विधवापण आले तर कुणाचे घटस्फाेट झाले. अशा मुलींना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. आज त्या मुली उच्चशिक्षित होऊन विविध पदांवर नोकरी करत आहेत. हे कार्य करत असताना मनाला समाधान वाटले.
>कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यात ही आनंद मिळाला. आपण अविवाहित आहोत, याबद्दल कधीही वाईट वाटले नाही. उलट समाजाचे काही देणे लागते म्हणून स्वत:च्या संसारात गुरफटता समाजसेवा करण्याची संधी मिळाली, याचे समाधान वाटते.
>कुटुंब संस्थेला माझा विरोध नाही. परंतु मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर त्या कुटुंबासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे त्यांना शिकू दिले पाहिजे. सासर किंवा माहेरच्या मंडळींनी ही गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे. लग्नानंतरही मुलींना इच्छेप्रमाणे शिकू दिले पाहिजे.