आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Midis Swain Then People Celebrate , Divya Marathi

मोदींच्या शपथविधीनंतर ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी अन् मिठाई वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशात सत्ता मिळाल्यानंतर उत्साहात भर पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शपथविधीचा सोहळा पार पडताच जळगाव शहरात जल्लोष केला. आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. सायंकाळनंतर सुरू झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शहरात जणू दिवाळी, दसरा अनुभवास आला.

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या आवारात एलसीडी स्क्रीनवर शपथविधी सोहळा दाखविण्याची व्यवस्था केली होती. पक्ष कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘अच्छे दिन आ गये’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता. ढोल-ताशांच्या गजरात सर्वच कार्यकर्त्यांनी नाचत जल्लोष केला. नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्या शपथविधीनंतर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सरचिटणीस दीपक फालक, अमित भाटीया, सुरेश भोळे, वैशाली पाटील, गटनेते डॉ.अश्विन सोनवणे, विरोधी पक्षनेते वामनराव खडके आदी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात फटाके फोडले. नागरिकांना मिठाईचे वाटप केले.

शहरात ठिकठिकाणी जल्लोष..
निकालानंतर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असलेल्या शपथविधीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एम.जे.कॉलेज चौकात नमो आर्मीचे जिल्हाध्यक्ष जयेश ठाकूर, शहराध्यक्ष सुरज दायमा यांनी नागरिकांना कार्यक्रम पाहता यावा, यासाठी एलसीडी स्क्रीन उभारली होती. तसेच चहा व मिठाईचे वाटप केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरसेवक उज्‍जवला बेंडाळे, सुरेश भोळे, वासंती चौधरी आदी उपस्थित होते. नवीपेठे,कांचन नगर, वाल्मीकनगर, स्वातंत्र्य चौक, भोईटेनगर, खोटेनगर, शाहुनगर, शिवाजीनगर, महाबळ कॉलनी, रिंगरोड, आकाशवाणी चौक, रामानंदनगर, वाघनगर परिसरातही आतषबाजी व लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एसएमआयटी परिसरात सुभाष चौधरी, दर्शन लोखंडे, धनंजय पाटील,जितेंद्र पाटील, कल्पेश गोर, अरुण पाटील आदींनी जल्लोष केला.