आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवव्या दिवशी धावली सूरत पॅसेंजर गाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सूरत मार्गावरील रेल्वेलाइनचे दुहेरीकरण हाेत असल्याने भुसावळातून सायंकाळी सुटणारी तसेच, सकाळी सूरतहून येणारी पॅसेंजर २२ फेब्रुवारीपासून बंद होती. अखेर मंगळवारी (दि.१) नवव्या दिवशी सायंकाळी पॅसेंजर सूरतकडे रवाना झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
रेल्वेच्या परिचालन विभागाने २७ फेब्रुवारीपर्यंत पॅसेंजर बंद असल्याची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात मार्चपर्यंत गाडी सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त झाली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी सूरत पॅसेंजर बंद असल्याचे समोर आले आहे. गाडी बंद झाल्यामुळे अमळनेर, पाळधी, धरणगाव येथून जळगाव, भुसावळला अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आहे. रेल्वेच्या परिचालन विभागाने २७ फेब्रुवारीपर्यंत पॅसेंजर बंद असेल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे २८ फेब्रुवारीला पॅसेंजरच्या फेऱ्या सुरू हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, मार्चला सायंकाळची गाडी रवाना झाली. रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही केले दुर्लक्ष
सूरत-भुसावळही पॅसेंजर गाडी पश्चिम रेल्वेची असल्यामुळे भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांना गाडीबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे २७ फेब्रुवारीची मुदत संपून तीन दिवस उलटूनही गाडीच्या फेऱ्या नियमित झाल्या नव्हत्या. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींचेही गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.