आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडा मोबाइल हिसकावल्यानंतर महिलेस बाय-बाय करून गेले चोरटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिलेच्या हातातून ४० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या दोन्ही भामट्यांनी चक्क महिलेकडे पाहून ‘बाय’ करीत पोबारा केल्याची घटना मंगळवारी दुपारी वाजता मोहननगर भागात घडली. यामुळे चोरट्यांची मुजोरी वाढली असून पोलिसांचाही धाक नसल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
 
मोहननगर भागात राहणाऱ्या सोनाली मनोज पाटील या शाळेच्या बसमधून येणाऱ्या आपल्या मुलीला घेण्यासाठी घराजवळील चौकात उभ्या होत्या. या वेळी दुचाकीवरून आलेला एक भामटा पाटील यांच्याकडे पाहत पुढे निघून गेला. बसला उशीर होत असल्यामुळे सोनाली या बसचालकाला फोन करणार तेवढ्यात आधी समोरून गेलेला भामटा दुसऱ्या दिशेने दुचाकीवर आणखी एकाला बसवून घेऊन आला.
 
त्यांनी वेग कमी करून त्यांच्याजवळून दुचाकी घेऊन मागे बसलेल्या भामट्याने हातातील मोबाइल हिसकावत त्यांना धक्का देत जमिनीवर पाडले. भांबावलेल्या अवस्थेत त्यांनी स्वत:ला सावरत दुचाकीकडे पाहिले असता, मागे बसलेल्या भामट्याने हात वर करून ‘बाय’ म्हणत पोबारा केला. या भामट्यांनी चेहऱ्यावर रुमाल देखील बांधलेले नव्हते. पोलिसांचा धाक बाळगता बिनधास्तपणे नागरिकांची लूट होत असल्याचे या घटनेतून समोर येते आहे.
 
पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही कॅमेरे
सोनालीपाटील यांनी पतीसह रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी भामट्यांचे वर्णन जाणून घेतले. त्यानंतर मोहननगर भागातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...