आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Swine Flue Now Dengu 14 Patients Found In Jalgaon

जळगावमध्‍ये स्वाइन फ्लूनंतर आता डेंग्यूची 14 रुग्ण आढळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पावसाळा व हिवाळ्यात मोठय़ा प्रमाणात आढळणारा डेंग्यूचा आजार आता उन्हाळ्यातही आढळत असून जळगावात दोन महिन्यांत 14 बालकांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्ण तापमानात जिल्ह्यात प्रथमच डेंग्यू आढळल्याचे शहरातील बालरोगतज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. विश्वप्रभा रुग्णालयात 2, चिरायू हॉस्पिटलमध्ये 2, तर अंकुर रुग्णालयात 10 रुग्ण आढळले आहेत. विश्वप्रभा रुग्णालयात भुसावळ येथील यज्ञा पाटील (वय 6) व यश पाटील (2) या दोन बालकांना 8 एप्रिल रोजी डेंग्यू झाला. त्यांची प्रकृती चांगली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी जाण्यास परवानगी दिल्याचे बालरोगतज्ज्ञ राजेश पाटील यांनी सांगितले. अंकुर रुग्णालयात गेल्या महिन्यात 14 बालकांना डेंग्यू आढळल्याचे डॉ. अजय शास्त्री यांनी सांगितले. चिरायू हॉस्पिटलमध्येही दोन महिन्यांत दोन रुग्ण दाखल झाले होते, असे डॉ. क्षमिक सिंग यांनी सांगितले.

रुग्ण वाढण्याची भीती
डेंग्यूचा डास शुद्ध पाण्यावरच आढळतो. सध्या टंचाईमुळे पाणी साठविण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे मच्छरही वाढले आहेत. डायरिया, ताप, पोटदुखीच्या तक्रारी बालकांना विशेषकरून जाणवत आहेत. सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये डेंग्यूचे प्रमाण अधिक असते. यंदा मात्र प्रथमच डेंग्यू बळावत चालल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शास्त्री, पाटील, सिंग यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.