आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका सभापतींच्या खुनानंतर शहाद्यात जाळपाेळ, दगडफेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहादा (जि. नंदुरबार) - पाणीवाटपाच्या वादातून बुधवारी शहाद्यात (जि. नंदुरबार) दोन गटांत तुंबळ हाणामारी हाेऊन एमआयएमचे पदाधिकारी तथा नगरपालिकेतील बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा तलवारीचे वार करून खून करण्यात अाला. यानंतर शहरातील गरीबनवाज परिसरात जमावाकडून जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यात पाच जण जखमी झाले.

गरीबनवाज कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या होती. या भागात नगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, पाणीवाटपावरून माजी नगरसेवक  मेहमूद शेख व त्यांचे समर्थक अाणि नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविकेचे पुत्र सय्यद मुजफ्फर अली, सय्यद नासीर अली यांच्या गटात बुधवारी तुंबळ हाणामारी झाली.  या हाणामारीत सय्यद मुजावर व सय्यद नाशीद अली लियाकत अली हे जखमी झाले. त्यानंतर दोघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. बांधकाम सभापती सद्दाम तेली हे त्यांना पाहण्यास जात असताना दुसऱ्या गटाने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या तेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गरीबनवाज कॉलनी परिसरात दगडफेक आणि जाळपोळ केली. पोलिसांच्या वाहनांचीही नासधूस केली. मात्र, जादा पोलिस कुमक आल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
बातम्या आणखी आहेत...