आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत माता की जय! पाकिस्तानवरील विजयानंतर गगनभेदी घोषणांनी शहर दणाणले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टी-२० विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिळवताच रात्री १२ वाजता विजयाचा जल्लाेष करण्यासाठी जळगावकर रस्त्यावर उतरले. ढाेल- ताशांच्या तालावर नाचत, फटाक्यांच्या अातषबाजीत हाेळीच्या तीन दिवस अाधीच जळगावकरांनी दिवाळीची धूम केली. ‘भारत माता की जय, गणपती बाप्पा, जय भवानी जय शिवाजी’चा नारा अाणि साथीला ढाेल-ताशांच्या दणदणाटाने शहर दणाणले हाेते.
भारत -पाकिस्तान सामन्यात विजय समाेर दिसताच युवकांनी नेहरू चाैकात धाव घेतली. फटाक्यांची अातषबाजी, ढाेल-ताशांच्या तालावर २०० ते ३०० तरुणांनी महापालिकेसमाेरील चाैकात जल्लाेष केला. सुभाष चाैक, गणेश काॅलनी, महाबळ, काव्यरत्नावली चाैक, शिव काॅलनी, मेहरूण भागात देखील किक्रेटप्रेमींनी रस्त्यावर येऊन जल्लाेष केला. भारताच्या विजयामुळे शहरात रात्री १२ वाजता अातषबाजी झाल्याने दिवाळीची अनुभूती अाली. नेहरू चाैकाला रात्री गणेशाेत्सव मिरवणुकीचे रूप अाले हाेते. चाैकांमध्ये सुरू असलेल्या जल्लाेषाची वार्ता पसरताच रस्त्याने जाणारे वाहनचालक, युवकांनी चाैकांकडे धाव घेतली. चाैक जाम झाल्याने पेट्राेलिंगवर असलेल्या शहर पाेलिसांची गाडी चाैकात दाखल झाली. १२.१५ वाजता पाेलिसांनी जल्लाेष करणाऱ्या युवकांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावरही धम्माल
विजयावर शिक्कामोर्तब होताच सोशल मीडियावर विविध प्रकारच्या संदेशांची धमाल उडाली. त्यापैकी निवडक संदेश...

{ इतिहास ना आजतक बदला है और नही बदलेगा,
पाक कल भी हमसे हारा था और आज भी हारा है।।
{ अभी अभी खबर मिली है, जाते जाते अफरिदी धोनी की कान में बोला "भारत माता की जय!'
{ पाक गर्ल्स : गोली से डर नही लगता साहब कोहली से लगता है।
पाकिस्तानवर टोलेजंग विजय मिळवल्यानंतर महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर रात्री १२ वाजता जल्लोष करताना तरुणाई.
बातम्या आणखी आहेत...