आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांनी महिला मरणयातनेतून मुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गाठ दाखवताना डाॅ. किरण पाटील.
जळगाव - पाचाेरा तालुक्यातील नेरी येथील मूकबधिर महिलेच्या गर्भपिशवीत दाेन वर्षांपासून (हाब्राॅइट युट्रस) गाठ तयार झाली हाेती. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून तिला १४ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. साेमवारी दाेन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर साडेतीन किलाेची गाठ काढली.

नेरी येथील मनीषा केशव गढरी या मूकबधिर महिलेच्या पतीचे चार वर्षांपूर्वीन निधन झाले.तिला माधुरी नावाची १५ वर्षांची मुलगी अाहे. दाेन वर्षांपूर्वी मनीषाच्या पाेटात दुखायला लागले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनंतर पाेटातील गाठ माेठी हाेत गेली. दरम्यान, मनीषाला मरणयाताना हाेत हाेत्या. मात्र, शस्त्रक्रियेचा खर्च एक लाखापर्यंत सांगितल्याने परिस्थिती नसल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. परंतु, काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करता येत असल्याचे सांगितले. त्यानंतर १४ एप्रिलला मनीषा सिव्हिलमध्ये दाखल झाली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.किरण पाटील यांनी भूलतज्ज्ञ डाॅ.उदय पाटील, परिचारिका सवता माळी, लता कुमावत यांच्या मदतीने दाेन तासांच्या प्रयत्नांनंतर साडेतीन किलाेचा गाेळा गर्भपिशवीतून बाहेर काढला.

कॅन्सरची शक्यता
हाब्राॅइडयुट्रसच्या गाठीची लवकर शस्त्रक्रिया केली नाही, तर भविष्यात गाठीत कॅन्सर हाेण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेनंतर साडेतीन किलाेची गाठ काढली अाहे. डाॅ.किरणपाटील, शल्यचिकित्सक

परिस्थिती नव्हती
खासगीरुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची अामची अार्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे अाम्ही सिव्हिलमध्ये अाॅपरेशन केले. मात्र, डाॅक्टरांनी चांगला इलाज केला. रत्नागढरी, रुग्ण मनीषाची जाऊबाई