आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजलच्या फाशीचे शहरात जोरदार स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजर गुरुला शनिवारी सकाळी फासावर लटकवण्यात आल्याचे समजताच शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपतर्फे बळीरामपेठेतील वसंतस्मृती कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तर पोलिस प्रशासनातर्फे शनिपेठ, काट्या फाइल, राम मंदिरसह संवेदनशील भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.