आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Agarsen Maharaj Anniversary Celebration,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समूह नृत्यात तरुणींची धमाल, अग्रसेन महाराज जयंती उत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रमांनी मसारोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अग्रसेनमहाराज जयंती उत्सवाचा समारोप गुरुवारी विविध कार्यक्रमांनी झाला. सकाळी अग्रवाल कम्युनिटी हॉलमध्ये ध्वजवंदन झाले, तर सायंकाळी गंधे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंतांचा गौरव करण्यात आला. समुह नृत्यात तरूणींनी चांगलीच धमाल केली. अध्यक्षस्थानी अँड.मुकेश गोयंका (औरंगाबाद) होते. व्यासपीठावर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव पवन मित्तल, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंशू अग्रवाल, सचिव दीपा टिबडेवाल उपस्थित होत्या. श्री.अग्रवाल नवयुवक मंडळ, अग्रवाल महिला मंडळ यूथ विंग अग्रवाल मंडळातर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिककार्यक्रमांनी चैतन्य
मान्यवरांच्याहस्ते अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, तर पूनमचंद पटवारी यांनी परिचय करून दिला. तसेच समाजातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी विजय अग्रवाल, आलोक अग्रवाल उपस्थित अादी होते. अंशू अग्रवाल यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी कला अग्रवाल सरला पटवारी यांनी स्वागतगीत म्हटले, तर गणेशवंदनेवर गौरी पटवारीने नृत्य सादर केले. स्नेहा, प्रद्युम्न, साक्षी कीर्ती यांनी समूहनृत्य केले. रंगांच्या थीममध्ये नियती, आंचल, कनक, दिव्या, जुही, खुशबू सानिका यांनी सहभाग घेतला. यासह गीतगायनाचा कार्यक्रमही या वेळी झाला. मंडळाचे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. तसेच सपन झुनझुनवाला, राजेश अग्रवाल, संजय अग्रवाल, कमलाबाई अग्रवाल, ललिता अग्रवाल, रेणू अग्रवाल, प्रतिभा अग्रवाल, दीप्ती अग्रवाल, रेखा अग्रवाल आदींनी नियोजन केले.