आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या घरासमाेरून अांदाेलकांना हुसकावले, खडसे समर्थक संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नारणे(ता. धरणगाव) येथे जिल्हा परिषदेशी संबंधित विकास कामांत भ्रष्टाचार झाला अाहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील डाॅ. सराेज पाटील हे गुरुवारी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानासमाेर उपाेषणास बसले. त्यामुळे संतप्त झालेले खडसेसमर्थक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अांदाेलनकर्त्यांना हात धरून उठवले. तसेच रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी त्यांना पाेलिस ठाण्यात घेऊन गेले. तर या अांदाेलनाला पाठिंबा देणारे अनिल नाटेकर यांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला.

नारणे येथे जिल्हा परिषदेशी संबंधित विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाला अाहे. तसेच चाैकशीत तसे सिद्धदेखील झाले अाहे; परंतु तरीही जिल्हा परिषदेचे सीईओ दाेषींवर कारवाई करत नाहीत. त्यामुळे जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील डाॅ. सराेज पाटील हे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पाेहाेचले. त्यांनी खडसेंच्या निवासस्थानासमाेरील रिकाम्या प्लाॅटवर उपाेषण सुरू केले. मात्र, पाेलिसांनी अांदाेलनकर्त्यांना उपाेषणास बसण्यास मज्जाव केला. तसेच रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी डाॅ. सराेज पाटील यांना नाेटीस बजावून मंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमाेर उपाेषण करण्यास परवानगी नाकारली.
या वेळी पाेलिस शिवराम पाटील यांच्यात अर्धा तास शाब्दिक चकमक झाली. त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते अशाेक लाडवंजारी, अॅड. संजय राणे, प्रवीण कुळकर्णी, अमित चाैधरी, सुनील खडके, सुनील माळी यांनी खडसे यांच्या निवासस्थानी पाेहाेचून उपाेषणकर्त्यांना हात धरून उठवले. तसेच पालकमंत्री घरी नसताना त्यांच्या घराबाहेर उपाेषण केल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची अाक्रमकता पाहून पाेलिसांनी शिवराम पाटील डाॅ. सराेज पाटील यांना रिक्षाने पाेलिस ठाण्यात नेले. या वेळी हे प्रकरण जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाशी संबंधित असताना शिवराम पाटील यांनी केवळ प्रसिद्धीसाठी पालकमंत्री खडसेंच्या निवासस्थानासमाेर अांदाेलन केले, असा अाराेप कार्यकर्त्यांनी केला.
पालकमंत्र्यांच्या घरासमोर शिवराम पाटील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद.

अांदाेलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
धरणगावयेथील विविध कामांमध्ये अपहार प्रकरणी कारवाईसाठी डाॅ. सराेज पाटील, शिवराम पाटील, अनिल नाटेकर यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमाेर अांदाेलन केले. अांदाेलनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे िवजय पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांवर कारवाई केली आहे.

पदाधिकाऱ्यां विराेधात तक्रार
भ्रष्टाचाराबाबतडाॅ. सराेज पाटील या खासदार रक्षा खडसे यांना गुरुवारी निवेदन देण्यासाठी गेल्या हाेत्या. त्या वेळी अशाेक लाडवंजारी, सुनील माळी यांच्यासह इतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद डाॅ. पाटील यांनी दिल्याने रामानंदनगर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे.